ताज्या घडामोडी

आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या सभा मंडपाचे भूमिपूजन

आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या सभा मंडपाचे भूमिपूजन

तळेगाव ता. बीड : 4 एप्रिल

फक्त १ महिन्यापूर्वी दिलेल्या आपल्या शब्दाला जागत बीड मतदार संघाचे तरुण व लोकप्रिय आमदार श्री. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी आपल्या आमदार फंडातून तळेगाव ता बीड येथील विश्वकर्मा मंदिराला सभा मंडप मंजूर करून त्याचे आज भूमीपूजन केले.
सुतार समाजाचे आद्य दैवत असलेले प्रभू विश्वकर्माचे तळेगाव येथे मंदिर आहे. दि २५ फेब्रुवारीला प्रभू विश्वकर्माच्या जयंतीला उपस्थित होते. आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी येथे सभामंडप देऊ असे आश्वासन दिले होते. त्या निमित्त आज दि ०४ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वा येथे उपस्थित राहून त्यांनी सभा मंडपाचे भूमिपूजन केले. हा कार्यक्रम मोजक्याच १५ लोकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला
तत्पूर्वी प्रभू विश्वकर्मा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे आ.संदीप क्षीरसागर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारास उत्तर देताना त्यांनी सांगितले कि, मी आपणास दिलेल्या वचना प्रमाणे या मंदिराच्या सभा मंडपाच्या बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित झालो आहे तसेच मंदिरासाठी व या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्या करिता बोअर घेण्य बाबत कार्यवाही करेल तसेच बोअर चा प्रश्न निकाली काढण्यासाठी संबंधिताना जागेवरच सूचना देऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे सांगितले त्यामुळे या भागातील सर्व रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे विश्वकर्मा सामाजिक प्रतिष्टान बीड व उपस्थित सर्व नागरिक यांनी त्यांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीचे अध्यक्ष श्री. सदाशिवराव सुतार , श्री. अशोक उनवणे, श्री. अरुण पांचाळ, श्री. बापूराव भालेकर, श्री.प्रमोद पांचाळ,श्री मुक्तेश्वर सांगोळे, श्री. अनिल डोरले, श्री. संतराम सांगोळे,श्री चंदू सांगोळे, श्री.पंढरीनाथ क्षीरसागर, श्री.नवनाथ अवंधकर, श्री.महेश डोरले, श्री.सुनील राव शिंदे,श्री.अतुल राऊत, श्री. किशन बनकर या सर्वांनी परिश्रम घेतले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close