क्राईमताज्या घडामोडी

गुन्हेगारीला चढता आलेख रोखण्यात कर्जत पोलिसांना यश ; अनेक गुन्ह्यांची उकल ;

पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल घेरिडेकर यांची धडक कारवाई

गुन्हेगारीला चढता आलेख रोखण्यात कर्जत पोलिसांना यश ;
अनेक गुन्ह्यांची उकल ;

पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल घेरिडेकर यांची धडक कारवाई ;

आकुर्ले :  विजय डेरवणकर

       मागील दोन वर्षात कर्जत शहर आणि ग्रामीण भागात ज्या चोऱ्या ,घरफोड्या , जीवघेण्या हाणामाऱ्या ,बलात्कार झाले होते यातील बहुतांश गुन्ह्यांची उकल करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे . याचे मुख्य कारण म्हणजे पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल घेरिडेकर यांची विशेष पथकाची नेमणूक करत आखलेली रणनीती होय . त्यामुळे कर्जत तालुक्यातील गुन्हेगारीला आळा बसला असून गुन्हेगारीचा चढता आलेख रोखण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे . यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे .
2019 मध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल घेरिडेकर आणि पोलीस निरीक्षक  अरुण भोर यांनी कर्जत पोलिस ठाण्याचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाचा चार्ज घेतला . कर्जत शहरातून तसेच तालुक्यातून गुन्हेगारी क्षेत्र रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन एक नियमावली आखली . कर्जत पोलिस ठाणे तसेच नेरळ पोलिस ठाणे असे गुन्हे शाखा प्रकटीकरणचे विशेष दोन पथक तयार केले . या पथकात पोलिस उपनिरीक्षक सचिन गावडे ,पोलिस हवालदार सुभाष पाटील, पोलिस अमलदार भुषण चौधरी ,पोलिस अमलदार अश्रूबा बेंद्रे आदी आहेत.  दिवसा रात्री पेट्रोलियम सुरु केले .  संशयीत व्यक्ती आढळून आल्यास त्याची चौकशी सुरू केली . महत्वाच्या ठीक ठिकाणी अचानक नाकाबंदी केल्या त्यात काही विना परवाना बाईकस्वरांकडून  कडून मोठ्या प्रमाणावर दंड ही वसूल करण्यात आला. परिणामी मोकाट फिरणाऱ्या बाईक स्वरांना चाप बसला . जबरी चोऱ्याहि  थांबल्या . काही गुन्ह्यांचा प्रकार घडल्यास स्वतः अनिल  घेरिडेकर तसेच अरुण भोर जातीने लक्ष घालून  घटनास्थळी धाव घेत आहेत .

          कर्जत शहर आणि ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ,चौका चौकात  सी सी टीव्हीचे जाळे पसरविण्यात आले . हद्दीतील गुन्हे प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने मोहल्ल्यातील अथवा सोसायटीच्या बैठका चालू करून जनजागृती करण्यात आली . यामुळे अनेक छोटया मोठ्या गुन्ह्यांची उकल होऊन आरोपींना गजाआड केले . गावठी दारूचे धंदे तसेच मटके जुगार अड्डे बंद केले त्यामुळे कर्जत शहरातून तालुक्यातून होणाऱ्या गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे

———————————–

प्रतिक्रिया :

                 गुन्हे रोखण्यासाठी एक नियमावली आखत काही तुकड्या तयार केल्या आणि त्यामध्ये गुन्हे शाखा प्रकटीकरण असे दोन पथक तयार केले.  कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडल्यास अथवा संशयित आढळल्यास प्रथमतः त्याचा संदेश माझ्याकडे पोहचला पाहिजे जेणेकरुन त्यावर योग्य तो  तपास सुरू करू शकतो .

 — अनिल घेरडीकर , पोलिस उपविभागीय अधिकारी – कर्जत
———————————————————————————

 प्रतिक्रिया :

शक्यतो अज्ञात व्यक्तीना आपल्या बँकेचे डीटेल्स देऊ नका.  कुठलीही बँक आपल्याला फोन वरून बँक ओ , टी ,पी बँक डीटेल्स विचारात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी अज्ञात व्यक्तीपासून सावध राहावे . त्यांच्या पासून धोका निश्चित आहे असे काही आढळल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा

— अरुण भोर , वरिष्ठ पोलिस निरीक्षक कर्जत
————————————————————————–

गुन्हेगारी चा आलेख

2019 च्या कालावधीतील गुन्हे

 खून – 1( गुन्हा उघडकीस ),खुनाचा प्रयत्न -1(गुन्हा उघडकीस ),जबरी चोरी -1 (उघडकीस ),घरफोडी -6(उघडकीस 5),चोरी -10(उघडकीस -4),बलात्कार -1(उघडकीस ) आदी गुन्हेही उघडकीस .
————————————————————————————————-

2020 च्या कालावधीतील गुन्हे ...

 खून – 0,खुनाचा प्रयत्न -3( गुन्हा उघडकीस 3 ),दरोडा -2( उघडकीस 2),घरफोडी -13(उघडकीस 3),चोरी -34(उघडकीस -8),बलात्कार -4(उघडकीस 4) आदी गुन्हेही उघडकीस .
———————————————————————————————–

2021 च्या कालावधीतील गुन्हे …

 खून – 0,खुनाचा प्रयत्न -0,जबरी चोरी -1 (उघडकीस ),घरफोडी -1(उघडकीस 1),चोरी -3(उघडकीस -2),बलात्कार – 0 आदी गुन्हेही उघडकीस .
——————————————————————–

फोटो : पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close