महाराष्ट्र

नाशिक चे जेष्ठ पञकार दिलीप कोठावदे रक्तदानातील शतकवीर

नाशिक चे जेष्ठ पञकार दिलीप कोठावदे रक्तदानातील शतकवीर, महाराष्ट्र बुक ऑफ रेकाॅर्ङमध्ये नोंद. नाशिक शांताराम दुनबळे. नाशिक-: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष दिलीप कोठावदे यांची रक्तदानाचे शतक करणारे, संपूर्ण भारतातील एकमेव पत्रकार म्हणून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये राष्ट्रीय विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या २०२१ च्या आवृत्ती मध्ये या विक्रमाची नोंद घेण्यात आली असून रेकॉर्ड बुकचे मुख्यसंपादक डॉ.सुनील पाटील यांनी
नोंदणीचे प्रमाणपत्र नुकतेच ऑनलाईन प्रदान केले.
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये कोणतीही माहिती प्रसिद्ध होण्यापूर्वी संबंधित माहितीच्या सत्यतेची खात्री करून घेतली जाते,त्यामुळे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् हा जगभरामध्ये माहितीचा एक विश्वसनीय स्त्रोत समजला जातो. तसेच यात प्रसिद्ध झालेल्या विक्रमांची जागतिक पातळीवर नोंद घेतली जात असून
राष्ट्रीय स्तरावर
महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध क्षेत्रात विक्रमी कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये केली जाते.
पत्रकार दिलीप कोठावदे यांनी आजतागायत १२५ वेळा रक्तदान केले असून मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे, आदिवासी क्षेत्रात खर्या अर्थाने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा व प्रबोधन करून रक्तदान शिबिर यशस्वी केले आहे आजपर्यंत शतकवीर, रक्तदाता, रक्तकर्ण ,रक्तगौरव,रक्तभुषण,आदर्श रक्तदाता, रक्त संक्रमण परिषद पुरस्कार, नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालय पुरस्कार, आदर्श युवा गौरव पुरस्कार, मुबंई दुरदर्शन ज्ञानदिप पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत कोरोना कालावधीत केलेल्या सामाजिक कार्यासाठी शंभर पेक्षा जास्त कोवीङ योद्धा सन्मान पञ विविध शासकीय निमशासकिय सामाजिक सांस्कृतिक संस्था मङंळ यांच्या कङुन प्राप्त झाली असल्याने आपलं महानगर पञकार दिलीप कोठावदे यांच्या विविध उपक्रमांची दखल महाराष्ट्र बुक ऑफ रेकाॅर्ङ ने शतकवीर म्हणून नोंद घेतली य विविध समाज हितोपयोगी कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय असल्याची दखल
त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close