ताज्या घडामोडी

कुची येथे चिकनगूनिया सदृश्य साथीने नागरिक ञस्त,उपाययोजना करण्याची नागरिकांतुन मागणी*:-

*कुची येथे चिकनगूनिया सदृश्य साथीने नागरिक ञस्त,उपाययोजना करण्याची नागरिकांतुन मागणी*:-
कुची (ता.कवठे महांकाळ) येथे चिकनगूनिया सदृश आजाराने अनेक रुग्ण त्रस्त झाले आहेत.आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जातआहे.ý
याबाबत अधिक माहिती अशी कुची येथील माळी गल्ली,शिवाजी चौक,गणेश चौक व परिसरात गेले काही दिवसापासून नागरिक ताप, अंगदुखी,सांधे दुखी,अश्या आजाराने त्रस्त झाले आसुन,सद्या याबाबत काहीजण उपचारही घेत आहेत.त्यापैकी काही जण बरेही झाले आहेत.गावात अस्वच्छतेमुळे डास मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.गावातील गटारे,पाणी साठण्याची ठिकाणे येथे त्वरित डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्याची आवश्यकता आहे.आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देवून उपाय योजना करावी व चिकन गुनिया सदृश्य आजार लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close