महाराष्ट्र

श्रमजीवी संघटनेच्या ऑनलाइन सभासद नोंदणीला प्रचंड प्रतिसाद

सुहास पांचाळ/ पालघर

श्रमजीवी संघटनेच्या ऑनलाइन सभासद नोंदणीला प्रचंड प्रतिसाद

उसगाव : मागील वर्षी म्हणजे 2020 मध्ये तब्बल 1 लक्ष 34 हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणीकृत करून श्रमजीवी संघटनेने महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना म्हणून नावलौकिक मिळविले होते, या वर्षीच्या सभासद नोंदणी मध्ये श्रमजीवीने अपग्रेडेड व्यवस्था निर्माण करून ऑनलाइन सभासद नोंदणी सुरू केली आहे. या महिन्यात संघटनेच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर घेऊन अँड्रॉइड मोबाईल ऍक्प्लिकेशन वापरून ही सभासद नोंदणी सुरू केली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काळासोबत होणारे सकारात्मक बदल स्वीकारण्याची संघटना बळकट आणि चिरतरुण राहते यावर माझा विश्वास आहे असे मत या निमित्ताने संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले.

38 वर्षांपूर्वी श्रमजीवी संघटना स्थापन झाली त्या वर्षी केवळ 84 सभासद होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली श्रमजीवी संघटनेची वाटचाल हजारो लोक जोडत सुरू होती. किमान वेतन,वन हक्क ,रेशन हक्क ,आदिवासींच्या हडपलेल्या जमिनी परत मिळवायची लढाई आशा असंख्य लढाया श्रमजीवी संघटनेने सक्षमपणे लढल्या, *आदिवासी कष्टकरी ढोर नाय,माणूस हाय*, *माणुसकीची भीक नको,हक्क हवा ,हक्क हवा* ही घोषणा घेऊन संघटनेने सावकारांकडे जनावरांप्रमाणे राबणाऱ्या बंधबिगारी बांधवांच्या आयुष्यात मुक्तीचा प्रकाश आणला. गुलामगिरी विरोधात केलेल्या अद्वितीय कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाने विवेक आणि विद्युलता पंडित या दाम्पत्याला अँटी स्लेव्हरी अवार्ड या अत्यंत मनाच्या पुरस्काराने सन्मानित केले. ब्रिटन मध्ये हा पुरस्कार स्वीकारण्याची केशव नानकर (आताचे श्रमजीवी चे उपाध्यक्ष) या मुक्त आदिवासी वेठबिगार बांधवाला सोबत घेऊन जाऊन विवेक आणि विद्युलता पंडित यांनी हा सन्मान स्वीकारला. सन्मानासोबतच अनेक हल्ले, मारहाण, मानहानी, केसेस आणि प्रचंड संघर्ष करून ही संघटना कण कणाने बळकट करण्याचे काम पंडित दाम्पत्याने केले.

मात्र बदलत्या काळानुसार नव नवीन कार्यकर्ते घडवून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या खांद्यावर संघटनेची जबादारी देण्याचे काम ही त्या त्या वेळी करण्यात आल्याने संघटनेने कधीही मागे वळून पाहिले नाही.2020 साली संघटनेने तब्बल 1 लाख 34 हजार संभासद नोंदवून विक्रमच केला. यात नवतरुण सभासद संख्या देखील लक्षणीय आहे. आता 2021 वर्षासाठी सुरू असलेली सभासद नोंदणी अगदी अपग्रेडेड असून तरुण सक्रिय कार्यकर्ते आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधून सभासद नोंदवून अत्यंत चोख हिशेब देत आहे. या ऑनलाईन नोंदणीमुळे रिअल टाइम मेम्बरशिप रेकॉर्ड आणि मेम्बरशिप फीस कलेक्शन होत असल्याने रेकॉर्ड अपडेटेड राहत आहे.

नव्या पिढीच्या नव्या विचारांच्या श्रमजीवीच्या या अपग्रेडेड सिस्टम मुळे तरुण वर्ग विशेष आकर्षित झालेला पाहायला मिळत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close