क्राईम

अपघात–रिक्षा -कार जळून खाक, तिघांचा होरपळून मृत्यु कर्जत-कल्याण राज्यमार्गावर दुर्घटना

चंद्रकांत सुतार--माथेरान

अपघात–रिक्षा -कार जळून खाक, तिघांचा होरपळून मृत्यु
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर दुर्घटना

चंद्रकांत सुतार–माथेरान

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर डिकसळ गावाजवळ कारने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील सीएनजी सिलेंडरचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, नेरळ पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली.
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. बदलापूर येथील कुळगाव भागात राहणारे सुभाष जाधव हे रिक्षा (एमएच 05-सीजी 4351) घेऊन पत्नी शुभांगी यांच्यासह सकाळी कर्जतमधील नेरळ पाडा येथे आले. तेथे राहणार्‍या सरिता मोहन साळुंखे यांना सोबत घेऊन ते कर्जतला गेले. कर्जत येथील कामे उरकून जाधव हे रिक्षा घेऊन कर्जत-कल्याण राज्यमार्गाने नेरळकडे येत होते.डिकसळ,गारपोली गावाचा जोडरस्ता ओलांडून रिक्षा सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर येत असताना कल्याण येथून कर्जत रस्त्याने जात असलेल्या हुंडाई एक्सेंट कारने रिक्षाला समोरून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की रिक्षाचालक यांच्या सीट खाली असलेला सीएनजी सिलेंडरचा स्फोट झाला, नी दोन्ही गाड्यांनी पेट घेतल्याने त्यात रिक्षाचालक सुभाष जाधव, शुभांगी जाधव (दोघे रा.बदलापूर) यांच्यासह सरिता साळुंखे यांचा अक्षरशः कोळसा झाला. या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. कारमधील तिघे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत.
या अपघातास कारणीभूत असलेल्या कारचालकास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनास्थळी आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी नारनवर अधिक तपास करीत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close