आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

स्व.अशोकराव [अण्णा] बनकर ग्रीनजिम पार्क, विधाते नगर येथे कोरोना १९ प्रतिबंधक योग शिबिर संपन्न*

निफाड तालूका प्रतिनिधी:मनोहर देसले.

*स्व.अशोकराव [अण्णा] बनकर ग्रीनजिम पार्क, विधाते नगर येथे कोरोना १९ प्रतिबंधक योग शिबिर संपन्न*

निफाड तालूका प्रतिनिधी:मनोहर देसले.

पिंपळगाव बसवंत चिंचखेड रोड परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी वार्ड नं२ चे ग्रामपंचायत सदस्य श्री.अल्पेश भाऊ पारख व श्रीमती सोनाली ताई विधाते तथा श्री.दिपक नाना विधाते यांनी दि:२१मार्च पासून ते २८ मार्च पर्यंत नि:शुल्क-भव्य योगप्राणायम ध्यान शिबिराचे आयोजन केले होते.
भव्य योग प्राणायाम शिबिराचे मार्गदर्शक योगशिक्षक श्री.संतोष जी शिरसाट यांनी अतिशय तळमळीने योगाचे धडे दिले .या योगशिबिरात परिसरातील बहुसंख्य नागरिक व महिला वर्ग यांनी उस्फूर्त पणे चांगला सहभाग घेतला शिबिर हे सकाळी ६:१५ ते ७:१५ या वेळेत असूनही स्रीशक्तीचे दर्शन चांगले दिसून आले .खरोखर शिबिराची आवश्यकता ही महिलांना अधिक आहे कारण त्यांचे आरोग्य चांगले असेल तरच त्या आपल्या कुंटुबाचे रक्षण करतील .सदर योग प्रशिक्षणात दररोज नवनवीन योग प्रशिक्षक येत होते त्यात प्रामुख्याने योगशिक्षक वैदिक गुरुकुल करंजगाव आणि नाशिक चे संस्थापक अध्यक्ष संस्कृत पंडित आचार्य मा.अण्णा पवार यांनी ही योगाचे महत्त्व सांगितले. सदर शिबिरात कोरोना चे संपूर्ण नियम पाळूनच योगसाधना करण्यात आली. या प्रसंगी शिबिरात *सूर्य नमस्कार, प्राणायाम, ध्यान, रोगानुसार आसने व आहार शास्र इत्यादी प्रकारांचे प्रात्यक्षिक करुन घेतले. योग शिबिराचे समापन प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे प्रति रामदेव बाबा व किसान सेवा समितीचे अध्यक्ष मा.मधूकरजी आवारे सर यांनी समारोप प्रसंगी संपूर्ण योगशिबिराचा आढावा घेतला व प्रत्यक्ष योग प्रात्यक्षिक करुन आपला सहभाग नोंदवला आणि खरोखरच आज रामदेव बाबा पिंपळगाव नगरीत अवतरले कि, काय अशी जाणीव झाली.शिबिर यशस्वी करण्यासाठी खालील योग साधकांनी चांगले सहकार्य कले त्यात प्रामुख्याने संदिप सोनवणे, गोकुळ गायकवाड, रतन अवारे,श्रीकांत वाघ,अशोक शिंदे सर,महिंद्र ठाकरे, संदिप तांबे,दिपक आहेर,दिपक दौंडकर,गीत मोरे, महिंद्र गायकवाड, सोनाली विधाते [ग्रामपंचायत सदस्या°] प्रतिभा पारख,रुपाली शिंदे, जयश्री सोनवणे, रोहिणी पाटील, किरण पारख व निशिगंधा जाधव यांनी सर्वस्वी प्रयत्न केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close