देशविदेशमहाराष्ट्र

मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण जो वळखीतसे औक्ष म्हंजी मोठी लढाई, अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बी खाई, गळ्यामंदी पडंल त्येंच्या माळ विजयाची, तू चाल रं पुढं,तुला रं गड्या, भीती कशाची… पर्वा बी कुणाची…

– All right are © reserved –

मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

जो वळखीतसे औक्ष म्हंजी मोठी लढाई,अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बी खाई,ळ्यामंदी पडंल त्येंच्या माळ विजयाची,तू चाल रं पुढं,तुला रं गड्या,भीती कशाची… पर्वा बी कुणाची...

लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब वयाच्या ७५त्तरी मध्ये कोरोना बद्दल ची जनजागृती मोहीम हातात घेऊन,नाशिक सह येवला येथे दौरे करून कोरोना चा आढावा घेत आहे.

नुकतीच कोरोना वर मात करून हा कोरोना योद्धा पुन्हा मैदानात येऊन ऑन फिल्ड काम करत आहे; प्रत्येक नागरिकाला हात जोडून विनंती करून कोरोना विरुद्ध जागृती करत आहे.

येवल्याची सध्याची कोरोना परिस्थिती भयानक आहे; नागरिकांनी सतर्क होऊन शासनाने घातलेले सर्व निर्बंध पाळून काम काज केले पाहिजे तरच कोरोना वर नियंत्रण करता येईल अन्यथा; परिस्थिती हाता बाहेर जाईल.

मास्क,सॅनीटायझर विशेष करून ग्लोज चे कंपलशन,सामाजिक अंतर करून ह्या परिस्थितीला हाताबाहेर जाण्या अगोदर आवर घातला पाहिजे; लॉकडाऊन ने सर्वसामान्यांची परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून ७५ वर्षाचा तरुण हात जोडून नियम पाळण्याची विनंती करतोय,लॉकडाऊन ने गोरगरीब जनतेला वेठीस धरले जाईल,अनेकांचा रोजगार जाईल लॉकडाऊन हा पर्यायच नाही पण *?* प्रशासन सांगून जरी लोक ऐकत नसतील तर लॉकडाऊन हाचं उपाय आहे.

लोकनेते भुजबळ साहेब येवला मतदार संघासाठी गेली अनेक वर्षा पासून काम करत आहे, त्यातच पुन्हा मुख्य भर पडली ती १०० बेड च्या येवला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाची; काल झालेल्या दौऱ्यात साहेब यांनी स्वतः कोरोना वॉर्ड मध्ये जाऊन रुग्णाची परिस्थिती बघितली, विशेष म्हणजे भरारी पथका प्रमाणे ऑन दी स्पॉट दिलेली रुग्णालयाला भेट ही चर्चेचा विषय ठरली.

साहेब,यांचे ७५ वर्ष वय असून ह्या वयात साहेब यांची तालुक्या प्रती तळमळ,काम करण्याची पद्धत, प्रशासनावर असलेली पकड आणि येवला तालुक्याचे आपण काही तरी देणे लागतो ही भावना पुन्हा एकदा सर्वांनी बघितली.

लोकनेता कसा असावा तर असा… परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळण्याची पद्धत,काम करण्याची हातोटी ह्या आपल्या लोकनेत्या मध्ये ठासून भरली आहे; साहेब आपले काम ह्या वयात तरुणांना ही लाजवेल एवढ्या व्यापक पद्धतीचे आहे.

भुजबळ साहेब यांनी रुग्णाची कोरोना वॉर्ड मध्ये जाऊन आस्थेने चौकशी करून पुन्हा एकदा येवला तालुक्याचा भूमिपुत्र असल्याच सिद्ध केले, साहेब यांच्या रुग्णालयाच्या भेटीने सर्वच अवाक झाले; डॉक्टर,नर्स आणि संपुर्ण स्टाफ यांचे साहेब यांच्या भेटीने मनोबल नक्कीच वाढले, त्यांना काम करण्याची उर्जा मिळाली.

साहेब,यांच्या भेटीने कोरोना रुग्णाना धीर मिळाला; साहेब आपल्या कार्याला खरचं मनापासून सलाम

✍️✍️कमलेश पैठणकर

न्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंञी –  छगण भुजबळ

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close