आरोग्य व शिक्षण

*पिंपळगाव लेप ता येवला येथे तलाठी व ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांनी विटभट्टी मजुरानां मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले*

पिंपळगाव लेप , ( सुनिल दुनबळे पोलिस टाइम्स प्रतिनिधी ) –

सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेले ग्रामपंचायत सदस्य विनोद भाऊ आहिरे व रत्नाबाई रसाळ ,संतोष रसाळ तसेच पिंपळगाव लेप येथील तलाठी श्रीमती पी एम दिंडोरकर व ग्रामसेवक श्री एम जे हिरे यांनी विट भट्टी मजुरांना करोना विषाणूबद्दल माहिती देत, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. योग्य खबरदारी घेऊन करोनापासून आपला बचाव करा, असे आवाहन त्यांनी विट भट्टी मजूरांना केले.
कोरोना विषाणूबद्दल नागरिकापर्यंत योग्य जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी पिंपळगाव लेप ग्रामपंचायत सर्व ठिकाणी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तलाठी श्रीमती पी एम दिंडोरकर व ग्रामसेवक श्री एम जे हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विट भट्टी वर काम करणाऱ्या मजूरांसाठी कोरोनाबद्दल माहिती दिली. तसेच सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले. विनोद आहिरे व रत्नाबाई रसाळ व संतोष रसाळ यांच्या या उपक्रमाचा आदर्श इतरांनी घेऊन एक हात मदतीचा दिला तर नक्कीच या संकटावर मात होईल. प्रत्येकाने माणूसकी जपत एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे, असे या उपक्रमातून विनोद आहिरे व रत्ना रसाळ व संतोष रसाळ यांनी दर्शविले आहे. विट भट्टी मजुरांना साहित्य वाटप करताना पिंपळगाव लेप चे ग्रामसेवक श्री एम जे हिरे व तलाठी श्रीमती पी एम दिंडोरकर, आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close