ताज्या घडामोडी

माथेरान मध्ये अखेर कोविड लस उपलब्द आज पासून 60 वर्षा वरील जेष्ठ नागरिकांना ही लस देणार

माथेरान मध्ये अखेर कोविड लस उपलब्द
आज पासून 60 वर्षा वरील जेष्ठ नागरिकांना ही लस देणार

चंद्रकांत सुतार—माथेरान

सर्वत्र कोरोना सारख्या महामारीमुळे नागरीक त्रस्त झाले असून या गंभीर आजाराची लस देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. परंतु माथेरान सारख्या पर्यटनस्थळावर ही लस उपलब्ध नव्हती , त्यामुळे नागरिकांन मध्ये असंतोष निर्माण झाला होता , तर्क वितर्क गावामध्ये चर्चिले जात होते, महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या वतीने ही कोविड लस देण्यात यावी या बाबत निवेदन आले होते, प्रशासकीय यंत्रणा कोविड लस माथेरान मध्ये लवकरात लवकर मिळविण्यासाठी प्रयन्त शील होतेच, याकामी माथेरान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य प्रशासन अलिबाग
( रायगड ) यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून माथेरान करांसाठी कोव्हिड १९ ही लस उपलब्ध करून घेतली आहे. लसीचे एकूण १५० डोस नगरपरिषदेच्या दवाखान्यात आलेले असून सुरुवातीला ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना ही लस दि .२६ मार्च पासून देण्यास सुरवात करण्यात आली, आज एकूण 30 जेष्ठ नागरिकांना कोविड लस देण्यात आल्या यावेळी मुख्याधिकारी प्रशांत जाधव , उपनगराध्यक्ष आकाशभाई चौधरी, माजी नगरसेवक,चंद्रकांत जाधव, डॉ तांबे, डॉ.प्रशांत यादव, डॉ प्रांजल सिस्टर गोळे, इंगळेसर रेश्मा आखाडे, प्राजक्ता शिंदे,,वनिता दिघे, राजेश वाघेला माथेरान मधील जेष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते,आज कोविड लस उपलब्ध झाल्याने नागरिकांनी तूर्तास तरी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

आजच्या कोविड लस जेष्ठ नागरिकांसाठी असल्याने बी जे हॉस्पिटल गावा पासून किमान 1 ते 2 किलोमीटर असल्याने जेष्ठ नागरिकांना जाणे- येण्या साठी नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी मोफत रिक्षा उपलब्द केली होती तर नगरपालिकेने सर्व जेष्ठ नागरिकांना एम्ब्युलन्स ची सोय केली होती .
————————————– वर्षावरील नागरिकांना लस देऊन झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येईल ह्यासंबंधीत माहिती नागरिकांना वेळोवेळी कळविण्यात येईल.

प्रेरणा सावंत – नगराध्यक्षा माथेरा

नगरपरिषदेच्या दवाखान्यात सध्या तरी कोव्हिड १९ लसीचे १५० डोस उपलब्ध झालेले आहेत.सुरुवातीला ६० वर्षावरील ३० जेष्ठ नागरिकांना आठवड्यातून तीन वेळा लस देण्यात येणार आहे. लस संपल्यावर पुन्हा अलिबाग येथून हे डोस मागविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १ एप्रिल पासून ४५ वर्षावरील नागरिकांना ही लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. प्रशांत यादव –वैद्यकीय अधिकारी नगरपरिषद माथेरान
————————————–

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close