कृषीताज्या घडामोडी

काळ्या कृषी कायद्याविरोधात व पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे येवल्यात उपोषण

काळ्या कृषी कायद्याविरोधात व पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे येवल्यात उपोषण

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात तसेच पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रचंड झालेली दरवाढ कमी करण्यात यावी यासाठी येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे तहसील कार्यालय, येवला येथे उपोषण करण्यात आले.

केंद्रातील भाजप सरकारने तीन काळे कृषी कायदे घाईघाईने संसदेत पारित करून घेतले सदर कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सदर कृषी कायदे रद्द करण्यात यावी. तसेच पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाचा गॅस चे वाढलेले अवास्तव दर कमी करण्यात यावे. यासाठी काँग्रेस पक्षातर्फे तहसील कार्यालयाचे आवारात उपोषण करण्यात आले. यावेळी काळे कृषी कायदे रद्द करावे व पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करावेत या मागण्या व केंद्र सरकारच्या विरोधी घोषणांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी तहसीलदार साहेबांचे प्रतिनिधी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व उपोषणाचे येवल्याचे प्रभारी भैय्यासाहेब देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, बळीराम शिंदे, युवक अध्यक्ष मंगल परदेशी,तालुका कार्याध्यक्ष संदीप मोरे, राजे आबासाहेब शिंदे, विलास नागरे किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, अण्णासाहेब पवार, राजेंद्र गणोरे शिवनाथ खोकले, कैलास घोडेराव, सुखदेव मढवई, नितीन झाल्टे आकाश घोडेराव, तेजस थोरात आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close