ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन भविष्याचा वेध घेणारा अग्रणीचा अभिनव उपक्रम*

कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार

*विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन भविष्याचा वेध घेणारा अग्रणीचा अभिनव उपक्रम*

अग्रण धुळगाव:- ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या आधुनिक युगात कुठेही कमी पडू नयेत म्हणून दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांच्या मध्ये उपजत असणारे विविध कौशल्य यांना वाव मिळावा यासाठी *अग्रणी पाणी फाउंडेशन श्री एम के जाधव हायस्कूल च्या संयुक्त विद्यमानाने मल्टी स्किल विविध कौशल्य कोर्स चे science लॅब बस च्या माध्यमातून मुलांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकल देण्यात आले.*

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

दहावी बारावी नंतर च्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण, बागकाम नर्सरी,अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान,फिटर वेल्डर बांधकाम, सुतारकाम,प्लंबर, पासून 10 वि 12 नंतर च्या करिअर च्या संधी आशा असंख्य विषयावर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद देऊन वेगवेगळे प्रात्यक्षिक करून दाखवले व पाककला पदार्थ बनवून सर्वांना खायला दिले असे आनंदित वातावरणात प्रात्यक्षिक संपन्न झाले.

*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अनुराधा देशमुख यांनी केले,श्री एम के जाधव हायस्कूल च्या वतीने मुख्याध्यापक चव्हाण सर प्रास्ताविक केले संचालक नेताजी भोसले ज्येष्ठ शिक्षक जीएस कनप,रावसाहेब कनप सर, भोसले मॅडम कुंभार सर सोनवणे सर सर्व शिक्षकांच्या वतीने प्रमुख पाहुणे मल्टी स्किल फाउंडेशन चे कॉर्डिनेटर अनिरुद्ध पाटील, पूजा पवार गणेश भिसे दत्तात्रेय शितोळे अग्रणी पाणी फाऊंडेशनचे शिवदास भोसले गणेश भोसले हेमंत खंडागळे यांचे स्वागत करण्यात आले. 🙏आभार शिवदास भोसले यांनी मानले*

अग्रणी पाणी फाऊंडेशन श्री एम के जाधव हायस्कूल च्या संयुक्त विद्यमानाने मुलांना विविध कौशल्य विकास प्रत्यक्षिक शिक्षण देण्यात आले.

मुलांवर वरचढ न होता, त्यांच्यातील सुप्तगुणांची वाढ म्हणजेच कौशल्यांचा विकास होण्याच्या दिशेने मदत करणे, हे पालकांचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे.

मुलांच्या गुणांची प्रभावीपणे आपण कशी वाढ करु शकतो यासाठी प्रत्येक पालकांनी काय काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत आज ‘ विविध कौशल्य अभ्यासक्रम *(skill foundation)* माध्यमातून आपण नेमके हेच जाणून घेऊया… लहान मुले जसे मोठे होतात तसे त्यांच्यातील सुप्तगुणांचीदेखील सोबतच वाढ होत असते. मात्र त्या सुप्तगुणांना योग्य वेळी चालना मिळाली नाही तर ते सुप्तगुण लुप्त होतात आणि त्याचाच परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. आणि आयुष्यात असामान्य कामे करायला प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य वेळी त्या गुणांचे संवर्धन होणे तेवढेच गरजेचे आहे, जेवढे की त्यांची शारीरिक वाढ होणे. आणि याच सुप्तगूणांचा म्हणजे कौशल्यांचा विकास करणे हे पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. मात्र त्या सुप्तगुणांचा विकास करणे हे पालकत्त्वासाठी एक प्रकारचे आवाहनदेखील आहे. आपला मुलगा सर्वगुण संपन्न असावा, असे कुणाला वाटणार नाही. दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे. आणि या स्पर्धेची जाणिव आता सर्वच पालकांना सतावू लागली आहे. मात्र धकाकीच्या जीवनात आपल्या पाल्यास घडविण्यासाठी पालकवर्गाकडे आवश्यक तेवढा वेळ नाही. मग त्यासाठी पालकवर्ग आपल्या पाल्यास घडविण्यासाठी बाहेरचे पर्याय शोधतात आणि अवाढव्य खर्चही करतात. मात्र एवढा खर्च करुनही आणि एवढी मेहनत घेऊनही आपला पाल्य घडेलच याची शाश्वती नसते. मात्र तज्ज्ञांच्या मते काही साध्यासोप्या गोष्टी जर पालकांनी केल्या तर आपल्या पाल्यातील कौशल्यांचा विकास होऊन तो परिपूर्ण बनू शकतो. मुलांच्या विश्वात सहभागी व्हाआपले मुले जर अभ्यासात रमले असतील तर त्यांचे निरिक्षण करा. शैक्षणिक कौशल्यांमध्ये त्याची प्रगती चांगली असेल, तर त्यांचे कौतुक करा. त्यातील आपला अनुभव त्यांच्याशी शेअर करा. आणि विशेष म्हणजे हे सर्व जाणून घेताना त्यांचेही भावविश्व आहे, हे विसरु नका आणि त्यांच्या विश्वात रममाण व्हा. श्रमाचे महत्त्व पटवा लहानपणापासून आपल्या मुलांवर श्रम संस्काराची जोपासणा करा. श्रमाने आपल्यातील गुणांचे सोने होते, हे त्यांना शिकवा. श्रमाने आपली बौद्धिक आणि शारीरिक वृद्धी होत असते. आणि या वृद्धीचा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात सिंहाचा वाटा असतो. घडलेल्या व्यक्तिमत्त्वातून भविष्यातील आव्हानांना आपण सहज पेलू शकतो. वेळेचा सदुपयोगआयुष्यातील एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, म्हणून मुलांना सुरुवातीपासूनच वेळेचा सदुपयोग करायला शिकवा. तसेच त्यांना फावल्या वेळेत प्रोडक्टिव्ह व्हायला शिकवा. त्याच्यातील गुणांना चालना देणाऱ्या चांगल्या शिक्षकांकडे पाठवा. तसेच त्यांच्या कौशल्यांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणाऱ्या शाळेत त्याचे अ‍ॅडमिशन करा. वेगवेगळ्या स्पर्धा पाहायला तसेच स्पर्धेत सहभाग घ्यायला त्याला प्रोत्साहन द्या. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी किती कष्ट करायची गरज आहे, याची कल्पना त्याला येईल.प्रेरणा / प्रोत्साहन द्या *मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्याबाबत त्यांना प्रेरणा देऊन त्यातील त्यांची प्रेरणेची पातळी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी जमवू द्या.* त्यासाठी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, व्हिडिओ आदी खरेदी करु शकता. मुलांना पुरेसा स्पेस, मोकळीकता द्यामुले जराही मोकळे दिसले तर पालक लगेच अभ्यास कर… हे कर… ते कर…म्हणजे कशात तरी गुंतवूण ठेवतात. मात्र यामुळे त्यांच्यातील कौशल्य लुप्त होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. मुलांचा सर्वांगिण विकासासाठी त्यांना सतत एकाच गोष्टींचा भडिमार करु नका. मुलाला त्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेशी मोकळीक द्या. मुलाला त्याचे काम करण्यासाठी प्रायव्हसी मिळावी यासाठी तुमच्या घरातील एखादी जागा त्याच्यासाठी तयार करा.

अध्यक्ष
शिवदास भोसले सर
(bsc bed) physics
अग्रणी पाणी फाऊंडेशनप्रशिक्षणानंतर मुलांनी स्वतः तयार केलेली विविध उपकरणे शोभेच्या वस्तू तसेच पाककला अशा विविध क्षेत्रांमध्ये मुलांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्य केले एकंदरीत छान सुंदर आनंददायी कौशल्य विकास अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न झालीआपला गाव आपला विकास यामध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करावी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अग्रणी पाणी फाउंडेशन च्या वतीने एम के जाधव हायस्कूल च्या पुढाकाराने शाळा व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्य यांच्या तत्परतेमुळे असे अनेक कार्यक्रम वेगवेगळे राबविण्यात येतील

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close