कृषी

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 बाधीत शेतकर्‍यांच्या निवाडा नोटीस तातडीने द्या..मागणी

कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 बाधीत शेतकर्‍यांच्या निवाडा नोटीस तातडीने द्या या मागणीसाठी गेली 20 दिवस झाले बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. प्रशासना मार्फत पत्र पाठवून आपल्या मागण्यांचे पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे लिखीत पत्राद्वारे कळविले आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या फेर सर्वे च्या किसान सभेच्या वतीने दिलेल्या यादीतील निम्म्या बाधीत शेतकर्‍यांच्या निवाडा नोटीस मिळाल्या एकाच दिवशी झालेल्या सर्वे च्या निवाडा नोटीस देण्यात का दिरंगाई होत आहे असा खडा सवाल बाधीत शेतकर्‍यांच्या वतीने किसान सभेने केला आहे. त्याच बरोबर 5 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या बाधीत क्षेत्रातील अतिरिक्त निवाडा नोटीस. मिरज तालुक्यातील 41 तर कवठेमहांकाळ तालुक्यातील 50 गटा पैकी फक्त 2 गटाच्या मिळाल्या आहेत. यामधील प्रशासनाचे काय गौडबंगाल आहे असा प्रश्न बाधीत शेतकर्‍यांना पडला आहे त्याच बरोबर शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथे महामार्ग साठी अतिरिक्त जमीन बाधीत होत आहे त्यामध्ये बांधकाम बोअरवेल फळझाडे बाधीत होत आहेत यांचा सर्वे पूर्ण झाला असून निवाडा नोटीस देणे बाकी आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवाडा नोटीस अध्याप मिळाल्या नाहीत तर नव्याने बाधीत शेतकर्‍यांच्या कधी मिळणार. व महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार. या सर्व पाश्र्वभूमीवर किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन सोबत

 

ःआज 23 मार्च शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिना पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. रोज दोन शेतकरी साखळी उपोषणास बसणार आहेत आज अमित पाटील व सुनिल करगने हे बाधीत शेतकरी उपोषणास बसले आहेत शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उपोषणाला सुरुवात करण्यात आली यावेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख. जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड दिगंबर कांबळे. कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अविराजे शिंदे सामाजिक कार्यकर्ते सुधीर नलवडे गुलाब मुलाणी चंद्रकांत गोडबोले संतोष गोडबोले रजनीकांत पाटील सागर पाटील माणिक पाटील हणमंत शिंदे मच्छिंद्र पाटील तुळशीराम गळवे व शेकडो बाधीत शेतकरी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close