क्राईमताज्या घडामोडी

आदीवासी दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी* – गणेश सातपुते – पेठ

गणेश सातपुते - पेठ तालुका प्रतिनिधी -

*आदीवासी दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी*

गणेश सातपुते – पेठ तालुका प्रतिनिधी

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पेठ विभाग तर्फे आज पेठ पोलिस स्टेशन मध्ये नांदगाव तालुक्यातील पिप्रळे येथे आदिवासी दाम्पत्य झालेल्या मारहानी बाबत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अंतर्गत कारवाई करण्यात यावी ह्या साठी आज निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील काळीमा फासणारी घटना घडलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पिप्रळे गावातील आदिवासी ऊस तोड दाम्पत्याला सावकार महिला कडून जी मारहाण व शिवीगाळ झाली ती घटना अत्यंत निर्दय असून त्या घटने संदर्भात आज त्या महिलेवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी आज पेठ पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
ह्या प्रसंगी युवा तालुका अध्यक्ष ओमकारभाऊ भोये,अनिल सातपुते,किरण पवार ,चेतन चौधरी ,सनी पेंटार ,दिनेश गावंढे,,दत्तू पवार, हिरामण खुरकुटे, गौरव चौधरी,मनोज तुंगार आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close