ताज्या घडामोडी

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण शिवभोजन थाळी

– All right are © reserved –

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

शिवभोजन थाळी√¤

– ज्या शिवभोजन थाळी मुळे गोर गरीब जनतेची पोटाची भूक मिटते; त्या शिवभोजन थाळीच्या संकल्पनेला सामान्य नागरिकांचा उस्पूर्त प्रतिसाद.

– सामाजिक बांधिलकी जोपासणारे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून शिवभोजन थाळीचा उपक्रम महाराष्ट्र भर राबवत असताना; स्वातंत्र्य नंतर च्या काळा नंतर पाहिल्यांदाच असा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आणि तो यशस्वी देखील झाला.

– झुणका भाकर केंद्राची योजना या अगोदर स्व.बाळासाहेब ठाकरे त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आली होती, परंतू काही काळा नंतर ही योजना बंद पडली; अगदी त्याच धर्तीवर शिवभोजन थाळीचा उपक्रम राबवण्यात आला आणि तो राज्यभर छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून नावारूपास आला व यशस्वी सुद्धा झाला.

– आज नाशिकसह राज्यभर ही शिवभोजन थाळीची योजना गोर गरीब जनता यांच्या पर्यंत पोहच होत आहे; अभिमान या गोष्टीचा वाटतो की येथे येणारा प्रत्येक लाभार्थी निसंकोच पने या योजनेला प्रतिसाद देतो लोकनेते भुजबळ साहेब यांच्या ध्येय धोरणे,दूरदृष्टी आणि नियोजन कौशल्याला या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून नक्कीच दाद द्यावी लागेल.¦

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

– लोकनेते भुजबळ साहेब यांचा आत्ता पर्यंतचा मंत्री असताना व सत्तेत असताना चा काळ हा कल्पक योजनेचा राहिला आहे,ह्यातून फक्त जनतेचे हितचं जोपासले गेले आहे; विविध विकास कामे,पाणीप्रकल्प,चळवळ संघटन,सामाजिक एकोपा,विविध प्रकराच्या लोक कल्याणकारी योजना साहेब राज्यासाठी घेऊन येतच राहिले.

– आपण जनतेच्या कसे कामी येऊ हाच अजेंडा साहेब समोर ठेऊन काम करत आहे.

– आज समर्थक म्हणून नाही तर येवला तालुक्याचा एक मतदार म्हणून साहेब यांना एक विनंती करावीशी वाटते की; गाव हा राज्याला जोडला जाणारा महत्वाचा घटक आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून आपण ही शिवभोजन थाळी जर खेडेगावा पर्यंत आपल्या संकल्पनेतून घेऊन आलात तर नक्कीच शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागातील लोक या योजनेवर समाधानी राहतील.

– शहरापेक्षा गावा कडे दुर्गम भाग आहे; आणि येथे थेट जनता जोडली गेली आहे; शिवभोजन थाळी जर खेडेगावा पर्यंत आली तर ह्या योजनेला नक्कीच एक विराट स्वरूप प्राप्त होईल व राज्यातील ही पहिली योजना असेल की जी जनते पर्यंत, शेवटच्या घटका पर्यंत पोहचली जाणारी योजना असेल आणि आम्हाला खात्री आहे की आमचा साहेब ही योजना गाव खेड्या पर्यंत घेऊन येण्यास यशस्वी होईल.

– खेडे गावात मोल मलजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे असंख्य लोक आहे; शिव भोजन थाळी ही थेट गावात गावात आली तर अन्न पुरवठा विभागा अंतर्गत ना भूतो…ना भविष्यते असं ह्या विभागाचे मोठ्ठे काम उभे राहील.ςः

– उत्कृष्ठ प्रकारचे हे शिवभोजन आहे, थाळीतील मेनू नागरिकांच्या चेहर्या वर समाधान व्यक्त करणारे आहे; आणि अभिमानाने सांगावस वाटते की ह्या थाळीचे सर्वेसर्वा आमचे साहेब आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

✍️✍️
डॉ.कमलेश पैठणकर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close