ताज्या घडामोडी

अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर जिल्हा बँकेने दिले लेखी पत्र शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे शेतजमिनीचे लिलाव स्थगित

अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर जिल्हा बँकेने दिले लेखी पत्र
शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे शेतजमिनीचे लिलाव स्थगित

प्रतिनिधी / येवला (एकनाथ भालेराव)

शेतकरी संघटनेने थकबाकीदार शेतकऱ्यांचे लिलाव न थांबविल्यास जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
१९ मार्च रोजी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या लिलावाच्या नोटिसा जिल्हा बँकेने काढल्या होत्या.यानंतर शेतकरी संघटनेने गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव न थांबविल्यास जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता.जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन जिल्हा बँकेकडून त्वरित अहवाल मागविला होता. आज आंदोलनपूर्वी भद्रकाली पोलिस ठाण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अधिकारी शेवाळे आणि त्यांचे सहकारी हजर झाले.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्यासह शेतकरी संघटनेच्या मोजक्या प्रतिनिधीशी सकारात्मक चर्चा होऊन शेतजमिनीचे लिलाव स्थगित करण्यात आल्याचे लेखी पत्र बॅंकेचे प्रतिनिधी शेवाळे यांनी दिले.यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे संतू पाटील झांबरे रामकृष्ण बोंबले शंकराव पुरकर शंकराव ढिकले ,बाळासाहेब गायकवाड ,अरुण जाधव बापू पगारे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे आणि थकबाकीदार शेतकरी उपस्थित होते.
फोटो – नासिक येथील भद्रकाली पोलीस ठाण्यात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करतांना पोलिस व जिल्हा बँकेचे अधिकारी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close