ताज्या घडामोडी

पँथर कवी गायक मनोहर जाधव यांचे स्मारक उभारणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*पँथर कवी गायक मनोहर जाधव यांचे स्मारक उभारणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
भारती धिंगान (प्रतिनिधी)
मुंबई दि. 20 – आंबेडकरी चळवळीत आयुष्य समर्पित करणारे दलित पँथरच्या काळात लढाऊ कार्यकर्ते कवी गायक म्हणून भरीव योगदान देणारे मनोहर जाधव यांचे माता रमाबाई आंबेडकर नगर येथे स्मारक उभारून त्यांच्या स्मृती जोपासण्यात येणार आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शहिद स्मारक सभागृहात दिवंगत पँथर मनोहर जाधव यांच्या जाहीर आदरांजली सभेत ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी विचारमंचावर भदंत शांतिरत्न; अध्यक्षस्थानी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबालकर; डी एम चव्हाण मामा; श्रीकांत भालेराव; तानाजी गायकवाड;योगेश शिलववंत;मुस्ताक बाबा; उदयराज तोरणे;लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर; वैशाली शिंदे;
गाथा ढाले; नागेश कांबळे; श्रीधर साळवे; राजा गांगुर्डे; जयंती गडा; सुमेध जाधव; नंदू साठे; अनिल घायवट;सिद्धार्थ कासारे;बाळासाहेब गरुड; सोना कांबळे; कैलास बर्वे;रवी नेटवटे; सुभाष किरवले;काका गांगुर्डे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पँथर मनोहर जाधव यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असे नसून रिपाइं चळवळीतील सर्वच कार्यकर्ते जाधव कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहेत.दिवंगत मनोहर जाधव यांच्या पत्नी शशिकला जाधव यांच्या पाठीशी रिपाइं ची महिला आघाडी भक्कम उभी आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले.

भारतीय दलित पँथर च्या चळवळ देशात भराभर वाढली. पँथर च्या शाखा बोर्ड सर्वत्र उभे राहिले. एक एक थेंब साठून समुद्र बनतो तसा एक एक कार्यकर्ता जोडून भारतीय दलित पँथर चा प्रवाह उभा राहिला. पँथर पासून रिपब्लिकन पक्षाच्या 40 वर्षांच्या वाटचालित पँथर मनोहर जाधव यांनी मला एकनिष्टपणे साथ दिली असे ना रामदास आठवले म्हणाले.

रुतून बसल्या आहेत माझ्या मनी
मनोहर जाधव यांच्या आठवणी
पर्वा पर्वा पर्यंत तू होतास बरा
का निघून गेलास मनोहरा
अशी कविता सादर करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत मनोहर जाधव यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी अनेक वक्त्यांनी दलित पँथर चळवळीतील आठवणींना उजाळा दिला.यावेळी दिवंगत मनोहर जाधव यांच्या पत्नी शशिकला जाधव; पुत्र हर्षु जाधव; योगेश जाधव;मुलगी वैशाली कैलास गायकवाड आणि रुपाली मनोहर जाधव; सून पल्लवी आणि वैशाली; नातू सुबोध आणि अंतरा आदी शोकाकुल जाधव परिवार उपस्थित होते. प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close