ताज्या घडामोडी

शेतकरी बांधवांसह शिवसेना पदाधीकार्‍यांचा आंदोलनाचा इशारा

शेतकरी बांधवांसह शिवसेना पदाधीकार्‍यांचा आंदोलनाचा इशारा

लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत शेतकरी बांधवांना अनेक वर्षापासुन मुलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे या सर्व समस्यांमुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले असून विविध संघटनांनी या बाबत लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीस वेळोवेळी निवेदने दिले आहे तरी लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समिती ने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे,तरी शेतकरी बांधवांनी शिवसेना पदाधीकार्‍यांन समवेत खालील सर्व समस्या सोडविण्या बाबत सभापती सुवर्णाताई जगताप,संचालक पंढरीनाथ थोरे,राजेंद्र डोखळे,भास्कर पानगव्हाणे, शिवनाथ जाधव,अनिल सोनवणे,रमेश पालवे,नवनाथ बोरगुडे,सचिव नरेंद्र वाढवणे यांना समस्या सोडविण्याबाबत निवेदन देवून नम्र विनंती केली आहे.मागण्या खालीलप्रमाणे
1) बाजार समितीत शेतकरी बांधवांसाठी निवास व भोजन व्यवस्था अद्यापही नाही. उत्कृष्ट दर्जाची निवास व
भोजन व्यवस्था निशूल्क व्हावी.2) शेतकरी बांधवांसाठी स्नानगृहात व शौचालयात आवाजवी दर घेतात ते तात्काळ नि:शुल्क व्हावे 3) जुन्या व नव्या मार्केट प्रवेश व्दारा लगत स्वच्छता गृहाची सोय नसल्यामुळे मार्केट संबंधी सर्व घटकांना नाईलाजास्तव प्रात: विधी उघड्यावर करावे लागते त्यामुळे परिसरात दुर्गधी चे सामराज्य पसरले आहे. त्यामुळे प्रत्येक गेट जवळ लवकरात लवकर स्वच्छता गृह बांधण्यात यावे.4) सर्व शेतकरी बांधवांच्या ट्रॅक्टर व पिकअपला रेडियम बिल्ले लावण्यात यावे. त्यामुळे रात्रीच्या होणार्‍या अपघातांना आळा बसेल. नवीन मार्केट मध्ये 1000 शेतमालाच्या टॅक्ट्रर साठी लिलाव शेड बांधण्यात यावे जेणे करून पावसाळ्यात शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान होणार नाही . रात्रीच्या वेळेस मुक्कामी जे शेतकरी बांधव शेतमालाच्या लिलालावासाठी येतात त्यातील शेतमालाच्या, डिझलच्या व बॅटर्‍या यांच्या चोर्‍या होतात. त्यासाठी बंद स्थीतित असलेले सी.सी टी.व्ही कॅमेरे तात्काळ चालू करावे व रात्रपाळीसाठी स्पेशल गार्ड ठेवावे.7) नविन मार्केट मध्ये कित्येक महिन्यांनपासून जे धान् पडलेले आहे त्या मुळे शेतकरी बांधवांना शेतमालाचे टॅक्ट्रर लावण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते त्या मुळे तात्काळ धान्य उचलून शेतमालाच्या टॅक्ट्रर साठी कायम स्वरूपी जागा मोकळी करावी नवीन व जुने मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात कचर्‍या साचल्यामुळे गटारी देखील तुंबल्या आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंदी पसरत असुन शेतकरी बांधव / व्यापारी घटकास आरोग्यास धोका निर्माण होत आहे.त्या तात्काळ स्वच्छ कराव्या 9) जूने मार्केट गेट नं 1 पासुन ते छत्रपती शिवाजी महाराज कांदा मार्केट/कृषक (भा.बा.अनुसंशोधन केंद्र) कोटमगाव पर्यंत र्व्हिसरोड,स्ट्रीटलाईट,साईड गटारी याची व्यवस्था मार्केट कमिटीच्या माध्यमातुन करावी.यामुळे वाहतुक कोंडीची समस्या थांबेल व अपघातांना आळा बसेल. वरील समस्या 20 ते 25 दिवसात न सोडवल्यास शिवसेना शेतकरी बांधवांसमवेत आंदोलन करेल याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील,युवासेना उपजिल्हा प्रमुख रविराज शिंदे ,गट संघटक ह.भ.प.बाळासाहेब शिरसाठ शेतकरी मधुकर भोर,वसंतराव होळकर,जालींदर गोजरे राहुल गवळी विशाल पोटे,देवेंद्र फापाळे,रविंद्र सोनवणे,केशव जाधव,मंदार खानापुरकर ,सौरभ देशमुख,धनंजय कहाणे ,प्रशांत जगताप,दिगंबर पाटील यांसह शिवसैनिक व शेतकर्‍यांनी दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मा.ना.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब मा. मुख्यमंत्री साो, महाराष्ट्र शासन
2) मा.ना.श्री. छगनरावजी भुजबळ साहेब (पालक मंत्री नाशिक जिल्हा)
3) मा.ना. बाबासाहेब पाटील साहेब, पणन मंत्री महाराष्ट्र राज्य
4) मा.ना. दादाजी भुसेसाहेब, कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य
5) जिल्हा उप निबंधक साहेब
6) मा.पोलिस निरीक्षक साहेब , लासलगांव पोलिस स्टेशन
यांना सादर केल्या आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close