ताज्या घडामोडी

पिंपळगावी शाळांना मिळणार मोफत चिमण्यांची घरटे. शाळेच्या मुख्याध्यापकाचे मागणी पत्र असणे बंधनकारक …..

पिंपळगावी शाळांना मिळणार मोफत चिमण्यांची घरटे.
शाळेच्या मुख्याध्यापकाचे मागणी पत्र असणे बंधनकारक …..
पिंपळगाव बसवंत प्रतिनिधी :-

पिंपळगाव बसवंत शहरातील आमी जीवदया संस्थेच्या वतीने दरवर्षी २० मार्च चिमणी दिनाच्या निमित्ताने विविध शाळांना भेटी देऊन चिमण्यांसाठी घरटी(Nest) व धान्याची (Bird Feeder)तसेच पाण्याची भांडी(Water Feeder) यांचा मोफत पुरवठा केला जातो.मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळांना भेटी देणे शक्य नसल्याने निफाड तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळांना मोफत चिमण्यांसाठी घरटी व फिडर देणार असल्याची माहिती पिंपळगाव बसवंत निफाड रोड बि.के पेट्रोल समोर असलेल्या अमीजीवदया कंपनीचे संस्थेचे संचालक हरेश शहा यांनी दिली असून ज्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक शाळेच्या आवारात ही घरटी लावण्यास इच्छुक असाल तर त्यांनी आज गुरुवार दि.१८ पासून रविवार दि. २१ मार्च सकाळी १० ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतपर्यंत संपर्क साधावा .त्यासाठी मुख्याध्यापक यांचे मागणीचे पत्र बांधनाकार असल्याची अट ठेवण्यात आली आहे तेव्हाच मोफत मिळणार असल्याचेही संचालक शहा यांनी सांगितले.

चौकट….
दरवर्षी चिमणी दिवसाच्या निमित्ताने शाळांना भेटी देऊन शाळेच्या परिसरात शेकडो चिमणीचे घरटे व त्यांना दाणापाणी साठी ब्लड फिटर व पाण्याच्या बाटल्या आधी साहित्य परिसरात बसवले जातात मात्र यावर्षी कोरोनाचा कहर असल्याने शाळांना भेटी देणे शक्य नाही त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांना व शिक्षकांना आम्ही याद्वारे आव्हान करतो की,मुख्याध्यापक यांचे मागणीचे पत्र दाखवून मोफत चिमणीचे घरटे व इतर साहित्य घेऊन जावे
हरेश शहा
अमीजीवदया संचालक
पिंपळगाव बसवंत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close