संपादकीय

माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे सलग १० वर्ष प्रतिनिधीत्व करणारे, माजी लोकप्रिय आमदार पंकजभाऊ भुजबळ यांचा आज वाढदिवस !

– All right © are reserved –

माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे सलग १० वर्ष प्रतिनिधीत्व करणारे, माजी लोकप्रिय आमदार पंकजभाऊ भुजबळ यांचा आज वाढदिवस !

ग्रामीण भागाला सुंदर रस्त्यांचे जाळे विणून,नांदगांव तालुक्याचे भाग्य बदलवणारे तालुक्यात रस्ते करून, ग्रामीण भागाला शहराचा मार्ग दाखवणारं हेचं ते पंकजपर्व !

– खरंतर ! नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार म्हणुन पंकजभाऊ भुजबळ यांची ओळख कायम राहिली आहे,ही ओळख आजही पहिल्या सारखीचं चिरंजीव आहे ! आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांनी भुतकाळात झालेल्या नांदगाव तालुक्याच्या बदलाला उजळणी देतांनी केलेला हा आजचा शब्द प्रपंच !

– आज ही नांदगाव तालुका बोलला की,पंकज भुजबळ यांचे नाव समोर येते,आज सुध्दा नांदगाव तालुक्याचा आमदार म्हणुन पंकज भुजबळ ह्यांचाच भास तालुक्याला होतो.

– सलग १० वर्ष तालुक्याचा आमदार म्हणुन अफाट विकासकामे पंकज भुजबळ यांनी केलेली आहे; त्यात रस्ते,पर्यटन स्थळे,तहसिल कार्यालय,पंचायत समिती इमारत ह्यांचा विशेष कामांचा उल्लेख आवर्जुन करावा वाटतो,फाटलेल्या नांदगाव तालुक्याला विकासाची चादर बहाल करणारा शांत,संयमी आमदार मिळने म्हणजे दुधात साखर पडावी असं.

– सत्य म्हणजे ? राजकारणाची आवड नसणार्या व्यक्तिंला जेव्हा,तालुक्याच्या विकासाचे स्वप्न पडतात आणि पडलेल्या स्वप्नाला प्रश्नाचे स्वरुप प्राप्त होते,तेव्हा विकासाच्या माध्यमातुन उत्तर मिळते,माजी आमदार पंकज भुजबळ यांनी जेव्हा नांदगाव तालुक्याच्या समस्या हातात घेतल्या तेव्हा भाऊंना तालुक्याच्या विकास माध्यमातुन राजकारणाची आवड झाली असेल असं वाटतं.

– अवघ्या २२ दिवसात,प्रथमचं नांदगाव मतदार संघातुन कोणताही जनसंपर्क नसतांनी प्रचंड मतांनी निवडुन आलेले विधान सभेतील तेव्हा पंकज भुजबळ हेचं एकमेव आमदार असतिल; विशेष म्हणजे कोणतीही तयारी नसतांना भाऊ चा आमदारकीच्या पहिल्या टर्म ला निर्णायक विजय झाला.

– अत्यंत कमी काळात नांदगाव तालुक्याचा कायापालट करणारे,पंकजभाऊ पहिलेच आमदार ! तालुक्यातिल व्यक्तिंना आपल्या साध्या स्व:भावातुन भुरळ पाडणारे नेहमीचं पसंतित राहीलेले पंकजभाऊ.

– वेळेनुसार फक्त वेळचं बदलते पण ? आपला काळजात जपलेला खास माणुस कधीचं बदलत नाही,नांदगाव मतदार संघाला तशी फारशी ग्रेट ओळख या अगोदर नव्हती पण ? माजी उपमुख्यमंञी तथा विद्यमान मंञी नाशिक जिल्हाचे फायरब्रँन्ड लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी पंकजभाऊ भुजबळ यांना नांदगाव ह्या दुष्काळी तालुक्याची जबाबदारी दिली,खांदा पक्का होता तशी जबाबदारी पेलणारा व्यक्ती सुध्दा प्रामाणिक होती.

– आमदार पंकजभाऊ भुजबळ यांनी नांदगाव मतदार संघाचा चेहरा मोहराचं बदलुन टाकला व विकासाची नाळ सर्वप्रथम ह्या मतदार संघाला जोडली.

– देशाचे लोकनेञुत्व जाणता राजा वंदनिय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी २००८ साली पक्षातुन इतर नेत्यांचा विरोध असतांना सुध्दा विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवुन जाती पातीला थारा न देता भुजबळ कुटूंबातुन दुसरा विधानसभा लढवणारा एक पुरोगामी विचारांचा,शांत,संयमी,मितभाषी असा समर्थ उमेदवार पंकजभाऊ भुजबळ यांच्या रुपाने तालुक्याला दिला.

– वर्तमान झपाट्याने भुतकाळात जात होता तसा नांदगाव चा विकास ही भविष्य गाजवत होता,बघता बघता नांदगावचे रस्ते,प्रशासकिय इमारती,सभामंडप,देवस्थाने विकासाने भरुन निघत होते, जनतेतं एक अजिंक्य पंकजपर्व नांदत होते.

– पंकजभाऊ भुजबळ यांच्या पहील्या टर्म मध्ये असंख्य विकास कामे झाले गरीबांचे प्रश्न सुटू लागले,मग ? दवाखाण्यात लागणार्यां पञा पासुन तर विकासाच्या प्रत्येक घटका पर्यत नांदगाव मध्ये घराघरात भुजबळ हे नाव वणवा पेटल्या सारखे भयानक पसरत होते,ते फक्त विकासाच्या बळावर.

– राजकारणात पंकज भुजबळ हे नाव त्या वेळेस राज्यातलं कमी काळात प्रसिध्द झालेलं एकमेव नाव होतं.

– आमदार असुनही पंकज भुजबळ मतदार संघात मोठ्या किंमतीची भव्य कामं जोमाने करु लागले.

– बघता बघता नांदगाव विधानसभा मतदार संघाची दुसरी टर्म आली,तेव्हा सुध्दा मोठ्या मताधिक्क्याने पंकज भुजबळ हे पुन्हा विजयी झाले.

– विकास अखंड टिकवण्यासाठी राष्ट्रवादी पाहीजे ? आणि राष्ट्रवादी साठी नांदगांव करांनों पुन्हा पंकजभाऊ पाहीजे.

– नांदगांव तालुक्याचे भाग्य बदलवणारे तालुक्यात रस्ते करून, ग्रामीण भागाला शहराचा मार्ग दाखवणारा आमचा युवा नेता पंकजभाऊ भुजबळ !

– भाऊ,वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा !

– I don’t care about popularity…? I live in reality and Based on originality !

✍️✍️
कमलेश पैठणकर
(वादळी प्रवास)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close