ताज्या घडामोडी

माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझी कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घ्या सीमाताई आठवले* *यांचे जनतेला आवाहन*

*माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझी कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घ्या सीमाताई आठवले* *यांचे जनतेला आवाहन*

भारती धिंगान (प्रतिनिधी)
मुंबई दि. 19 कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नियमित मास्कचा उपयोग करणे सुरक्षित अंतर राखणे सॅनिटाइझरचे वापर करणे साबणाने स्वच्छ हात धुणे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यक्तिगत काळजी घेतानाच शिस्त पाळणे आपल्या कुटुंबाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे राज्याच्या मुख्यमंत्रांनी नुकतेच माझा कुटुंबाची जबाबदारी माझी अशी मोहीम राबवली आहे असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी व रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी मार्गदर्शिका सौ सीमाताई आठवले यांनी आवाहन केले

आयोजित महिला आघाडी च्या वतीने स्नेह संमेलन व कोरोना संदर्भात जनजागृती मोफत सॅनिटाइझर मास्क वाटप करण्यात आले रिपब्लिकन पक्षात नितूताई मोरे यांच्यासह महिलांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान युनिट नंबर 32 आरे कॉलनी मुंबई येथे कार्यक्रमाला मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे तालुका अध्यक्ष फुलचंद कांबळे रमेश पाईकरव सूर्यप्रकाश भदर्गे बेला मेहता लक्की मिश्रा आत्माराम बाविस्कर रेश्मा खान रमेश पाळंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close