ताज्या घडामोडी

कर्नाळ मधील युवकाचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून.

खुनातील आरोपींच्या अवघ्या पाच तासात मुसक्या आवळल्या.



हेडिंग-कर्नाळ मधील युवकाचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून.
खुनातील आरोपींच्या अवघ्या पाच तासात मुसक्या आवळल्या.
मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास कर्नाळ मधील स्वप्नील उर्फ छोट्या दशरथ कांबळे,वय वर्ष 26,राहणार समाजमंदिरा जवळ कर्नाळ.या युवकाचा भोरा म्हसोबा कर्नाळ येथे धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला.खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या अवघ्या पाच तासात सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी मुसक्या आवळल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार मयत स्वप्नील उर्फ छोट्या दशरथ कांबळे,याचा व त्याच्या घरा शेजारी राहणारा प्रणव उर्फ पण्या प्रकाश माने,यांच्यात घरासमोर रस्त्यावर khowt ठेवल्याच्या कारणावरून वाद झाला होता.त्या वादाचा राग मनात धरून यातील आरोपी प्रणव उर्फ पण्या माने,याने त्याचे सिद्धार्थ नगर कुपवाड येथील साथीदार अनिरुद्ध उर्फ अन्या संजय माने वय वर्ष 19,अभिषेख नितीन धोत्रे वय 19,प्रीतम उर्फ अपर्ण राजू सरोदे,वय 18,गौरव प्रमोद घाडगे,वय 20,रोहित मोहन वाघमारे,वय 23,व दोन अल्पवयीन मुले यांना बोलावून घेऊन कोयता, सुरा,व चाकु या प्राणघातक हत्याराने मयत स्वप्नील उर्फ छोट्या कांबळे याच्या डोक्यावर,पोटावर,छातीवर,
हाताच्या दंडावर सपासप वार करून निर्दयीपणे खून केला.सदर गुण्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम अपर पो अधीक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली अजित टेके,यांनी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या,त्याप्रमाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील सह पो निरीक्षक प्रशांत निशानदार,पो हेड कॉन्स्टेबल संदीप मोरे,महेश जाधव,कपिल साळुंखे,पो कॉन्स्टेबल सचिन मोरे,यांचे पथक तयार करून गुण्यातील आरोपींच्या शोधासाठी रवाना केले.सदर पथकाने सांगली कुपवाड सिद्धार्थनगर येथे ठीक ठिकाणी आरोपींचा शोध घेऊन गुन्हा दाखल झालेपासून अवघ्या पाच तासात गुण्यातील सहा आरोपी व दोन अल्पवयीन बालक यांना अटक केली.अटक आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयातून आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली.गुण्याचा पुढील तपास पो निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पो अंमलदार संदीप मोरे,सचिन मोरे हे करत आहेत.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
महेश पवार(मिरज तालुका प्रमुख)8484990076
विजय तिकोटी(सांगली जिल्हा प्रमुख)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close