ताज्या घडामोडी

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने*

*हेडिंग-* *अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने*
*अतुल शिंदे (डफळापूर प्रतिनिधी)96736 14925*
विजय तिकोटी(सांगली जिल्हा प्रतिनिधी)9834181802
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयातील परिसर घोषणांनी दणाणून सोडला महामार्ग बाधित शेतकर्‍यांच्या फेर सर्वे च्या निवाडा नोटीस तातडीने द्या तसेच शिरढोण येथील नव्याने बाधीत शेतकर्‍यांच्या बाधीत क्षेत्र बांधकामे बोअरवेल च्या निवाडा नोटीस तातडीने द्या. शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्या. कामगार विरोधी कायदे रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या. शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथे गेली बारा दिवस झाले बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आणी जो पर्यंत सर्वे झालेल्या सर्व बाधित शेतकर्‍यांच्या निवाडा नोटीस मिळणार नाहीत तो पर्यंत शिरढोण येथील धरणे आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय किसान सभेच्या वतीने बाधित शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्याच बरोबर विविध आंदोलने करण्यात येणार आहेत याच पार्श्वभूमीवर आज कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. व मागण्यांचे निवेदन मा. तहसीलदार गोरे साहेब यांना देण्यात आले. यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड दिगंबर कांबळे. राजर्षी शाहू विचार मंचाचे अध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे बाळासाहेब पाटील रजनीकांत पाटील हणमंत शिंदे आनंदराव पाटील सागर पाटील अमित पाटील रावसाहेब पाटील लक्ष्मण चौगुले वसंत कदम प्रदीप पाटील सुनील करगने गोरख सुर्यवंशी मच्छिंद्र पाटील विनायक सुर्यवंशी एकनाथ कदम तातोबा चव्हाण व इतर शेतकरी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close