ताज्या घडामोडी

नागरीकांनी गांभीर्याने घेतली नसून येत्या रविवारपर्यंत परिस्थितीचा आढावा घेवून कठोर निर्णय घ्यावा लागेल असे संकेत जिल्हाधिकार्‍यांनी दिले*

*नागरीकांनी गांभीर्याने घेतली नसून येत्या रविवारपर्यंत परिस्थितीचा आढावा घेवून कठोर निर्णय घ्यावा लागेल असे संकेत जिल्हाधिकार्‍यांनी दिले*

 

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्हयात अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र ही बाब अद्यापही नागरीकांनी गांभीर्याने घेतली नसून येत्या रविवारपर्यंत परिस्थितीचा आढावा घेवून कठोर निर्णय घ्यावा लागेल असे संकेत जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.
नाशिकमध्ये कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात ज्या जिल्हयांमध्ये रूग्णसंख्या वाढत आहे अशा ‘टॉप टेन’ जिल्हयांमध्ये नाशिकचा पाचवा क्रमांक लागतो. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये रूग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा पार केला असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.परंतु निर्बंध लादत असतांना अर्थचक्र रही सुरू राहीले पाहीजे याचा विचार करून जिल्हयात सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तरीही सायंकाळी ७ वाजेनंतर नागरिक बिनधास्तपणे वावरतांना दिसून येतात त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या परिस्थितीचा आढावा घेवून जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, गेल्यावर्षी आपण या परिस्थितीतून गेलो आहोत. यावर्षी मागच्यापेक्षा अधिक मोठया प्रमाणावर कोरोनाची लाट दिसून येत आहे. याकरीता काही निर्बंध लादण्यात आले आहे. खरं म्हणजे पूर्ण लॉकडाऊन करणे हे अगदी सहज सोपे असतांना नागरीकांचे हाल होवू नये, अर्थचक्रही सुरू राहावे याचा सारासार विचार करून कडक निर्बंध लादण्यात आलेले नाही. सकाळी ७ ते सायंकाळी ७ बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
अद्यापही धोका टळलेला नाही. कोरोना मृत्युदर दोन टक्के आहे तो शुन्य झालेला नाही. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढत गेली तर काय होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही याचा अनुभव नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करून निर्बंध पाळावेत, आपली आणि आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close