आरोग्य व शिक्षण

माधवनगर मधील एका शाळेतील शिपाई याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने शाळेतील विद्यार्थी याच्या सह पालकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क महेश पवार (मिरज तालुका प्रमुख)8484990076 विजय तिकोटी (मिरज तालुका प्रमुख)9834181802

हेडिंग- माधव नगर मधील एका शाळेतील शिपाई कोरोना पॉझिटिव्ह

फुटर – विद्यार्थी सह पालकांन मध्ये भीतीचे वातावरण

अँकर – माधवनगर मधील एका शाळेतील शिपाई याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने शाळेतील विद्यार्थी याच्या सह पालकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येणारे चार दिवस शाळा बंद ठेवण्यात येणार असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती सरपंच अनिल पाटील यांनी दिली आहे.

माधवनगर मध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, कोरोनाचा दुसऱ्या टप्यातील तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. माधवनगर मधील शाळेतील एका शिपायाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती वेवस्तीत असून त्यास होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र शाळेतील शिपाई पॉझिटिव्ह आल्याने शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांच्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी दुपारच्या सुट्टी मध्ये शाळेला सुट्टी देण्यात आली.
दरम्यान माधवनगर आरोग्य विभागाचे डॉ. कुरकुटे आणि आरोग्य सेवक अजय भानुसे यांनी रुग्णांच्या घरी भेट देऊन रुग्णांनावर्ती औषध उपचार सुरु केले आहेत. त्याच्या घरच्यासह संपर्कात आलेल्या शाळेतील सर्वांची तपासणी येत्या चार दिवसांमध्ये केली जाणार आहे. सरपंच अनिल पाटील याच्याशी संपर्क साधला असता. संबधित व्यक्तीची औषध उपचारासह सर्व काळजी घेतली असून, शाळा चार दिवसासाठी बंद ठेवण्यात आली आहे. येणाऱ्या चार दिवसात रुग्णांनाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे आणि शाळेतील सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार असून सर्व महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क वापरणे, वारंवार हात निर्जंतुक करणे, सामाजिक अंतर ठेवणे सुरु करावे असे आवाहन सरपंच अनिल पाटील यांनी केले आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
महेश पवार (मिरज तालुका प्रमुख)8484990076
विजय तिकोटी (मिरज तालुका प्रमुख)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close