ताज्या घडामोडी

सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सावित्रीबाई फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी.

सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सावित्रीबाई फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी.

_ बुधवार दिनांक 10 मार्च 21 सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त शिवसेना कार्यालय गणेश मार्केट जवळ सांगली येथे सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन चे संचालक व बाहुबली ट्रान्सपोर्ट चे मालक माननीय महेश पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिवसैनिक व महेश पाटील यांच्याबरोबर चर्चा करत असताना सांगलीतील प्रलंबित ट्रक टर्मिनल चा विषय प्राधान्याने राजकीय पुढाऱ्यांनी सोडवावा असे मत व्यक्त महेश पाटील यांनी केले तसेच पुढे ते म्हणाले की सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन हे सांगली जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत असून सन 2010 साली तात्कालीन महाराष्ट्र सरकार व महानगरपालिकेला सांगलीतील प्रलंबित ट्रक टर्मिनल चा प्रश्न सोडवावा व पद्मा टॉकीज मागील सुमारे 17 एकर जागा मध्ये ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनला भाडेतत्वावर सदरची जागा महापालिकेने ट्रान्सपोर्ट असोशियन कडे हस्तांतरित करावी अशी मागणी करण्यात आली होती त्यासाठी ट्रान्सपोर्ट असोशियन कडून सदरच्या प्रस्ताव देताना सुमारे 40 ते 50 कोटी रुपये खर्च करून ट्रक टर्मिनल विकसित करण्याची तयारी दर्शवली होती तसा प्रस्ताव ही तत्कालीन महापालिका सत्ताधाऱ्यांना व आयुक्तांना व महाराष्ट्र सरकारकडे दिला होता परंतु दुर्दैवाने सदरचा प्रस्ताव लालफितीत अडकून पडल्याचे महेश पाटील यांनी खंत व्यक्त केली आता परत एकदा सांगलीतील सर्व आमदार, खासदार,नगरसेवक, मंत्री, व सर्वपक्षीय नेते मंडळींनी सदरच्या प्रलंबित ट्रक टर्मिनल साठी प्राधान्याने प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले तसेच ते पुढे म्हणाले की ट्रान्सपोर्ट असोशियन ला सदरची 17 एकर जागा ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी भाडेतत्त्वावर महापालिकेने दिल्यास एका छत्राखाली सर्व सांगली जिल्ह्यातील व सांगली-मिरज महापालिका क्षेत्रातील सुमारे 800 ट्रान्सपोर्ट व्यवसायिक एकत्र येऊन तसेच याठिकाणी प्रशस्त असे मेकॅनिक यांचे एकत्रित करून मेकॅनिकल व्यवसाय सुद्धा या एका छत्राखाली आणता येईल व सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट विक्रेते सुद्धा या ठिकाणी एकत्र आणता येईल तसेच सुमारे 2000 ट्रक बसतील असे सुसज्य ट्रक टर्मिनल उभा करता येईल या सर्वाचा फायदा मोठ्या प्रमाणात महापालिकेला उत्पन्न वाढीसाठी होणार आहे व महापालिकेला करोडो रुपयाचा कर या माध्यमातून मिळण्यास मदत होणार आहे हे महापालिका प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे यासाठी महापालिकेला करोडो रुपये सदरच्या ट्रक टर्मिनल चा फायदा होण्यास मदत होणार आहे यासाठी सदरचा लागणारा निधी ट्रान्सपोर्ट असोशियन 60 ते 70 कोटी रुपये स्वतः निधी उभा करून ट्रक टर्मिनल करण्याची तयारी दर्शविली असताना महापालिका व सरकारने मानसिकता दाखवून सांगलीतील प्रलंबित ट्रक पार्किंग मार्गी लावावे असे त्यांनी म्हणाले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी सांगलीच्या वैभवात भर पडणार असेल तसेच ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व इतर व्यावसायिक यांना चांगले आर्थिक स्तोत्र व बेरोजगारांना सदरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असेल तर शिवसैनिक सदरचा प्रलंबित ट्रक टर्मिनल चा प्रस्ताव तयार करून महापालिकेकडे व शासनाकडे सदरचा प्रस्ताव ताबडतोब पाठवावा त्यासाठी शिवसैनिक सदैव रस्त्यावर उतरून तुमच्या खांद्याला खांदा लावून सदरचा ट्रक टर्मिनल चा प्रस्ताव मान्यतेसाठी शासन दरबारी व महापालिका प्रशासनाकडे प्रयत्न करून मार्गी लावण्याचे शिवसैनिकांनी आश्वासन दिले यावेळी रावसाहेब घेवारे, पंडितराव बोराडे, प्रसाद रिसवडे, जितेंद्र शहा, लक्ष्‍मण वडर, प्रकाश लवटे, उपस्थित होते*
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
सुरज शेख(माधवनगर प्रतिनिधी)7038028787
विजय तिकोटी(सांगली जिल्हा प्रमुख)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close