ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अधिवेशन संपताना वीज ग्राहकांना धक्का

महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अधिवेशन संपताना वीज ग्राहकांना धक्का
वृतांकन संपादक शातांरामभाऊ दुनबळे
◼️अधिवेशन संपण्यास काही तास उरले असतानाच राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची थकबाकीदारांची वीज कनेक्‍शन कापण्याबाबतची स्थगिती उठवण्याची घोषणा!

◼️ सचिन वाझे म्हणजे लादेन नाही, दोषी लोकांवर कारवाई नक्कीच होणार म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले!

◼️ गेल्या 24 तासात महाराष्ट्रात आढळे 17 हजार 721 कोरोनाग्रस्त; देशभरात कोरोना ग्रस्तांची संख्या जास्त असलेल्या राज्यात महाराष्ट्र आजही अव्वल!

◼️’सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना हा विषय गंभीर आहे. अशीच जर रुग्णसंख्या वाढली, तर आवश्यक निर्णय घ्यावा लागेल’, उद्धव ठाकरेंकडून लॉकडाऊन बाबत मोठे विधान!

◼️ कोरोना काळात 30 टक्के पगार कपात करण्यात आल्यानंतर या महिन्यापासूनचे म्हणजेच 1 मार्चपासून आमदारांचे वेतन होणार पूर्ववत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा!

◼️नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफझईचा लहान मुलांसाठी ड्रामा, डॉक्यूमेंट्री, कॉमेडी, ॲनिमेशन आणि सीरीज बनवण्यासाठी ॲपल कंपनी सोबत अनेक वर्षांसाठी करार!

◼️पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अज्ञातांचा हल्ला; ममता यांच्या डाव्या पायाला दुखापत, उपचारासाठी कोलकात्याला रवाना!

◼️ राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखाली फरहान अख्तर घेऊन येतोय ‘तुफान’ नावाचा चित्रपट; 21 मे रोजी अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज!

◼️ 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ काही काळाने येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची दिग्दर्शकावर नामुष्की वेळ आली

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close