ताज्या घडामोडी

अटकेनंतरही श्रमजीवी कार्यकर्त्यांनी दाखवले शिस्तीचे प्रदर्शन

अटकेनंतरही श्रमजीवी कार्यकर्त्यांनी दाखवले शिस्तीचे प्रदर्शन

पालघर प्रतिनिधी : सुहास पांचाळ

दि.९ मार्च : आदिवासी विकास मंत्र्यांनी खावटी योजनेची घोषणा करून, परिपत्रक काढून वर्षभर खावटी देण्यात कसूर करून आदिवासींची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ आज श्रमजीवी संघटनेने अत्यंत कौशल्यपूर्ण असे मुंबईत आदिवासी विकास मंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन केले.
या आंदोलनानंतर मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिसांनी श्रमजीवी आंदोलकांना अटक केले.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे आवारातच स्वच्छता करत, तेथील कचरा, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या उचलत पोलिसांनी अचंबित केले.

या अटकेतील आंदोलक कार्यकर्त्यांनी दाखवलेले हे शिस्तबद्ध वर्तन पोलिसांना सुखद धक्का देणारे ठरले. येथील अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या या कृतीचे कौतुक केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close