ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्याच्या अर्थ संकल्पातील महत्त्वाच्या आजच्या घोषणा

महाराष्ट्र राज्याच्या अर्थ संकल्पातील महत्त्वाच्या आजच्या घोषणा
वृतांकन संपादक शातांरामभाऊ दुनबळे
मुंबई नाशिक-:महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज जाहीर केला. करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राकडं विशेष लक्ष देण्यात आलं आहे. त्याशिवाय, महिलांच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पायाभूत सोयीसुविधांवरही सरकारनं भर दिला आहे. शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलात सूट ही आजची सर्वात मोठी घोषणा ठरली आहे.

आज थकीत वीज बिलात ३३ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, थकबाकीच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के अतिरिक्त माफी देण्यात येणार आहे. या अंतर्गत ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ रकमेच्या ६६ टक्के, म्हणजेच अंदाजे ३० हजार ४११ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत.

कृषी क्षेत्रासाठी इतर घोषणा

तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या व वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटी रुपयांची योजना

शेतकऱ्यांना कृषी पंप वीज जोडणी देण्यासाठी महावितरणला दरवर्षी १ हजार ५०० कोटींचे भागभांडवल

प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे ५०० नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार

राज्यातील चार कृषी विद्यापीठांना येत्या तीन वर्षांत ६०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार

कृषी, पशू संवर्धन, दूग्ध व मत्स्यव्यवसाय विभागास ३ हजार २७४ कोटी नियतव्यय
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेंतर्गत लाभार्थींना गाय व म्हशीचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुक्कुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसंच, कंपोस्टिंगसाठी अनुदान इ .घोषणा करण्यात आल्या आहेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close