ताज्या घडामोडी

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे लसीकरण केंद्र सुरू…

सुहास पांचाळ : पालघर प्रतिनिधी दि.०6

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे लसीकरण केंद्र सुरू…
सुहास पांचाळ : पालघर प्रतिनिधी दि.०6 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ०१ मार्च, २०२१ पासून वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरु झालेल्या कोव्हीड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर सोबतच ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील व्यक्ती ज्यांना सहव्याधी आहेत अशांना तसेच ६० वर्षावरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच शासनाने निश्चित केलेली खाजगी रुग्णालये यामध्ये सदर लसीकरण केंद्र सुरु करण्यात येत आहेत. सद्य स्थितीत वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्र खालीलप्रमाणे सुरू करण्यात आले आहे.
१. वरुण इंडस्ट्रीज, वालीव वालीव, वसई पूर्व

२. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दिवाणमान दिवाणमान तलावाजवळ, वसई पश्चिम

३. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वसई (सर डी.एम.पेटीट हॉस्पिटल) पारनाका, वसई पश्चिम

४. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटणकर पार्क पाटणकर पार्क, नालासोपारा पश्चिम

५. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रानळे तलाव रानळे तलाव, मनवेलपाडा रोड, विरार पूर्व

६. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, निदान विराटनगर, विरार पश्चिम

७. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, चंदनसार साईदत्त अंगणवाडी, चंदनसार, विरार पूर्व

८. विजयनगर-तुळींज रुग्णालय नागिनदास पाडा, विजयनगर, नालासोपारा पूर्व

९. जनसेवा हॉस्पिटल वसई पश्चिम

१०. विजयालक्ष्मी हॉस्पिटल नालासोपारा पूर्व

११. गोल्डन पार्क हॉस्पिटल वसई पश्चिम

१२. लाईफ केअर हॉस्पिटल नालासोपारा पूर्व

१३. जीवदानी (अलायन्स) हॉस्पिटल नालासोपारा पूर्व

१४. संजीवनी हॉस्पिटल विरार पश्चिम

१५. बदर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल नालासोपारा पश्चिम

वरील नमूद वयोगटातील व्यक्तींना selfregistration.cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन प्री सेल्फ रजिस्ट्रेशन करून अपॉइंटमेंट घेता येईल तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही अपॉइंटमेंट घेऊन लसीकरण करून घेता येईल. लसीकरण केंद्रावर येणाऱ्या लाभार्थ्यांनी केंद्रावर गर्दी न करता एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवावे व मास्क परिधान करावे असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close