ताज्या घडामोडी

पंचवटीतील तपोवन परिसरात महाविद्यालयीन युवकाला कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करणारे २ अटक*.

आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने ही कारवाई...*

*पंचवटीतील तपोवन परिसरात महाविद्यालयीन युवकाला कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करणारे २ अटक

*आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने ही कारवाई…*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक- पंचवटीतील तपोवन भागात कोयत्याचा धाक दाखवून महाविद्यालयीन तरुणांना लुटण्याचे प्रकार घडत होते. या संशयितांच्या मागावर पथक होते. अशाचप्रकारे तपोवन भागातील महापालिकेच्या जलकेंद्र येथे निर्मनुष्य स्थळी लूटमार झाली होती. संशयित हे जेलरोड परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली.या आधारे गुन्हे शोधपथकाचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, भास्कर वाढवणे, जगदीश जाधव, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी, विश्वास साबळे, योगेश कदम, सचिन बाहीकर, वैभव परदेशी यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने तपास करत दोघांस अटक केली तर एकास ताब्यात घेतले. संशयितांची सखोल चौकशी केली असता लूट केल्याची कबुली दिली. या संशयितांकडून दोन मोबाइल, एक कोयता, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. संशयितांनी अशाचप्रकारे अनेकांची लूट केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.संशयित दीपक गायकवाड (२२, रा. गोरेवाडी, जेलरोड),अनिकेत रोकडे (१९, रा. कॅनॉलरोड, जेलरोड) या दोघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने ही कारवाई केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close