ताज्या घडामोडी

धवल यशाची परंपरा कायम* *श्रीज्ञानेश्वरी परीक्षेत स्वामी मुक्तानंद विद्यालयाचा प्रेम मुळे राज्यात प्रथम तर चि.गायके,चि.चौधरी,चि.कायस्थ,कु.बनछोड द्वितीय*

*धवल यशाची परंपरा कायम*
*श्रीज्ञानेश्वरी परीक्षेत स्वामी मुक्तानंद विद्यालयाचा प्रेम मुळे राज्यात प्रथम तर चि.गायके,चि.चौधरी,चि.कायस्थ,कु.बनछोड द्वितीय*
येवला=( सचीन वखारे) श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येवला च्या पाच विद्यार्थी यांनी राज्यस्तरीय श्रीज्ञानेश्वरी लेखी परीक्षेत धवल यशाची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत राज्यातून वीस पेक्षा अधिक केंद्रावर सदर परीक्षा झाली. *पूज्य मामासाहेब दांडेकर* अनुवादित व *संत ज्ञानेश्वर महाराज* लिखित श्रीज्ञानेश्वरी ग्रंथावर सदर परीक्षा झाली.स्वामी मुक्तानंदविद्यालयात १९९८ पासून हि परीक्षा घेतली जाते.यंदा विद्यालयाचा *चि.प्रेम मनोज मुळे* हा विद्यार्थी राज्यात सर्वप्रथम आला असून रोख *पाच हजार व प्रमाणपत्र* त्यास नुकतेच प्राप्त झाले आहे. *चि.सिद्धार्थ बाबासाहेब गायके,रोहण अजय कायस्थ,कार्तिक भोलेनाथ चौधरी,कु.प्रांजल प्रवीण बनछोड* यांनी सर्वांनी विभागून राज्यात द्वितीय पारितोषिक प्रत्येकी रोख अडीच हजार व प्रमाणपत्र त्यांस नुकतेच प्राप्त झाले आहे.गुणवंत विद्यार्थी यांना या परीक्षेचे संयोजक व स्पर्धा परीक्षा प्रमुख श्रीज्ञानेश्वरी ग्रंथाचे अभ्यासक तथा प्रसिद्ध निरूपणकार *पं.डाॅ श्री प्रसाद शास्त्री कुळकर्णी* यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे *अध्यक्ष माननीय श्री डाॅ अमृतसा पहिलवान ,सेक्रेटरी माननीय श्री दीपकभाऊ गायकवाड, प्रशासनाधिकारी श्री आर.आर.चिंचलेसर तथा प्राचार्य श्री ए.जी.नाकील सर* यांनी गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close