ताज्या घडामोडी

सांगलीतील जुन्या पाणीपुरवठा करणाऱ्या कालबाह्य पाईप बदला या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपमहापौर उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

हेडिंग-सांगलीतील जुन्या पाणीपुरवठा करणाऱ्या कालबाह्य पाईप बदला या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपमहापौर उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
सांगली मिरज महापालिकेचा विस्तार 118 चौरस किलोमीटर असल्याने सदरच्या महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठया प्रमाणात कृष्णा नदीतून पाणी उपसा करावे लागते.पण त्याचा नागरिकांना पाणीपुरवठा शुद्ध करणे महापालिकेला अश्यक्य होत आहे.याचे प्रमुख कारण 1950 साली तत्कालीन नगरपालिकेने सांगली शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकल्या,पण 1950 सालापासून आज अखेर सुमारे 70 वर्षाच्या जुनाट पाईप फुटलेल्या कालबाह्य झालेल्या तशाच जमिनीत असल्यामुळे सदरच्या पाईप आतून मोठया प्रमाणात गंज धरून फुटून खराब झाल्यामुळे त्याला मोठया प्रमाणात छिद्रे पडली आहेत.त्यामुळे मोठया प्रमाणात काही ठिकाणी पाण्याची गळती होऊन शुद्ध पाण्यामध्ये अशुद्ध पाणी मिक्स झाल्यामुळे सर्वत्र गढूळ पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे महापालिका क्षेत्रातील व सांगलीतील जनतेला मोठया प्रमाणात साथीच्या रोगांना बळी पडावे लागत आहे.याची दखल महाराष्ट्र सरकारने व महापालिका प्रशासनाने घ्यावी.वखारभाग,गावभाग,राममंदिर परिसर,कॉलेज कॉर्नर परिसर,इत्यादी परिसरात नगरपालिकेने टाकलेल्या पाईप 70 वर्षांपूर्वीच्या असल्यामुळे खास करून या परिसरात मोठया प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे या परिसरातील जुन्या पाईप लाईन बदलून नवीन पाईप लाईन टाकताना अत्याधुनिक पाईप टाकाव्यात,तसेच या परिसरात होणारा दूषित पाणीपुरवठा त्यातून मुक्तता करावी व नवीन पाईप लाईन तात्काळ टाकावी.या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपमहापौर यांना निवेदन देण्यात आले.तसेच सदरच्या पाईप लाईन बदलल्या नाहीत तर शिवसेना रस्त्यावर उतरून नागरिकांच्या प्रश्नांसाठी व पाणी प्रश्नांसाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी सांगली जिल्हा शिवसेना माजी पदाधिकारी जितेंद्र शहा,स्वप्नाली कुरळपकर,मुमताज मुजावर,पंडितराव बोराडे,प्रसाद रिसवडे,मानसी शहा,विधुला मेहता,रावसाहेब घेवारे, प्रकाश लवटे, व पदाधिकारी व कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्तीत होते.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
सुरज शेख (माधवनगर प्रतिनिधी)7038028787
विजय तिकोटी(सांगली जिल्हा प्रमुख)9834181802

आपल्या सहकार्याने आम्ही पोलीस टाईम्स न्युज 24 हे you ट्यूब चॅनेल सुरू केले आहे.या आपल्या चॅनेल ला subscribe करा आणि पहा आपल्या जवळच्या शहरातील व गावातील बातम्या आपल्या चॅनेल वरती.🛑पोलीस टाईम्स न्युज 24🛑
🛑पोलीस आणि जनतेचे व्यासपीठ🛑

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close