ताज्या घडामोडी

प्रा. बाळासाहेब चकोर यांना पी.एचडी पदवी प्रदान

*प्रा. बाळासाहेब चकोर यांना पी.एचडी पदवी प्रदान

* नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक:- येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील भूगोल विभागातील प्रा. बाळासाहेब रघुनाथ चकोर यांना भूगोल विषयातील पदवी नांदेड येथील येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून नुकतीच ( Phd) पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. सदानंद गोने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.चकोर यांनी संशोधन कार्य पूर्ण केले आहे. बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा. डॉ. आर पी भोळे (जळगाव) ,डॉ. मगरे , प्रा. डॉ. बी एस जाधव, विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ मुढे, डॉ.पराग खडके ,डॉ, माळी, (लातूर ), डॉ. धेनेश्वर , विद्यापीठाचे सिनेट सदस्य युवराज पाटील तसेच अनेक प्राध्यापक वर्गासह आदी मान्यवर उपस्थित होते. या यशबदल संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष अँड. पी. आर.गिते, सरचिटणीस हेमंत धात्रक ,सहचिटणीस अँड तानाजी जायभावे संस्थेचे विश्वस्त व संचालक मंडळ तसेच , कोंडाजी( मामा) आव्हाड (माजी अध्यक्ष), अभिजीत दिघोळे,सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता हरिभाऊ चकोर, प्राचार्य डॉ.वसंत वाघ, प्राचार्य डॉ. संजय सानप , शिक्षणाधिकारी डॉ राजेंद्र सांगळे, उपप्राचार्य डॉ पोर्णिमा बोडके, प्राचार्य ,डॉ.हरिदास राठोड ,डॉ.प्राचार्य सुभाष निकम डॉ.काळगापुरे ,डॉ. कनकुरे, प्राचार्य डॉ विठ्ठल घारपुरे ,प्राचार्य डॉ प्रकाश सावंत, अशोकराव चकोर ,आदी मान्यवर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close