ताज्या घडामोडी

येवला,बोकटे यात्रेच्या राखीव जागेवरील अतिक्रमण न हटवल्यास १५ मार्च पासून बोकटे,देवळाणे,दुगलगाव ग्रामस्थांचे बोकटे ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण.

*येवला,बोकटे यात्रेच्या राखीव जागेवरील अतिक्रमण न हटवल्यास १५ मार्च पासून बोकटे,देवळाणे,दुगलगाव ग्रामस्थांचे बोकटे ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण.*
येवला /प्रतिनिधी :- सय्यद कौसर
नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र बोकटे येथे भगवान श्री काल भैरवनाथाच्या सालाबादप्रमाणे भरणाऱ्या यात्रेत नाशिकसह नगर,औरंगाबाद जिल्ह्यातील असंख्य भाविक,व यात्रेची शोभा वाढवणारे विविध व्यावसायिक येत असतात,त्या साठी बोकटे ग्रामपंचायतीने नियमितपणे कर वसुली करून यात्रे साठी जागा उपलब्ध केली होती,मात्र त्या जागेवर मोठ्या प्रमाणात विना परवानगीने अतिक्रमण झाल्याने यात्रे साठी असणारी राखीव जागा पूर्ण संपुष्ठात आल्याने येण्याऱ्या काळात यात्रेच्या जागेची मोठी समस्या निर्माण झाली आहे.सदर घटनेकडे बोकटे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने शासकीय जागेवर अतोनात अतिक्रमण होत आहे म्हणून शासनाने तातडीने चौकशी करून संबंधित अतिक्रमण हटवण्यासाठी आदेश द्यावे व योग्य ती कार्यवाही करावी.अशी मागणी बोकटे,देवळाणे,दुगलगाव येथील भाविक व ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अतिक्रमण न हटवल्यास दि.१५ मार्चला बोकटे ग्रामपंचायत कार्यालया समोर शासकीय नियमावली लोकशाही मार्गाने उपोषणाला बसणार असल्याच निवेदनात म्हटले आहे.तसेच ‘अतिक्रमण हटवण्याची कोनाचीही हिम्मत नाही’ अशी अतिक्रमण धारकांची चर्चा विविध ठिकाणी सुरू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी श्रीकाल भैरवनाथाच्या यात्रेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.म्हणून सीताराम दाभाडे,रावसाहेब लासुरे,गोरख काळे,सकाहरी दाभाडे,संदीप साळवे,सोमनाथ दाभाडे,संभाजी दाभाडे,प्रकाश दाभाडे,रामनाथ दाभाडे,अशोक लासुरे,राहुल लासुरे,चांगदेव मोरे,रावसाहेब कदम,गणेश बोंबले,कृष्णा संत,सुभाष दाभाडे आदीसह ६५ ते ७० सह्यासह देवळणे,दुगलगाव  ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचे पाठिंबा असलेले पत्र निवेदनास जोडुन आज बोकटे ग्रामपंचायत सरपंच प्रताप दाभाडे व ग्रामसेवक मोरे यांना देण्यात आले आहे.
*प्रतिक्रिय…….
*बोकटे ग्रामपंचायत यात्रेसाठी जागा देऊ शकत नसेल,आणि भाविकांची गैरसोय होत असेल तर ट्रस्ट करण्यासह देवळाणे गावात यात्रा भरवण्यास परवानगी द्यावी– गोरख काळे,उपसरपंच देवळाणे.
………………………
तातडीने निर्णय न झाल्यास प्रशासना विरुद्ध न्यायालयात धाव घेणार.-सकाहरी दाभाडे,सा. कार्यकर्ते बोकटे.
……………………….
येवला तालुक्यातील विद्यमान आमदार  अन्न व सुरक्षा मंत्री,तथा नाशिक जिल्ह्यातील  पालक मंत्री  आहेत त्यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे व असंख्य भाविकांना न्याय मिळवून द्यावा. – रावसाहेब लासुरे, सरपंच दुगलगाव
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close