ताज्या घडामोडी

शिवसेना साजगाव पं.स विभागप्रमुखपदी चिंतामण चव्हाण यांची निवड

  1. शिवसेना साजगाव पं.स विभागप्रमुखपदी चिंतामण चव्हाण यांची निवड

    खालापूर – समाधान दिसले

    आगामी काळात होणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षानी मोठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर कर्जत खालापुर विधानसभा मतदार संघात शिवसेनेने काही पदाधिकारी निवड करीत मोठे फेरबदल करण्यात येत असून ग्रुप ग्राम पंचायत साजगाव माजी सदस्य चिंतामण रामचंद्र चव्हाण याची शिवसेना साजगाव पंचायत समिती विभागप्रमुखपदि निवड केल्याने त्या आशयाचे नियुक्ती पत्र आमदार महेंद्र थोरवे, खालापूर तालुकाप्रमुख संतोष विचारे, समन्वयक एकनाथ पिंगळे सह इतर पदाधिकारी वर्गाच्या हस्ते चिंतामण चव्हाण यांना आमदार निवासस्थानी येथे संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात देण्यात आल्याने चव्हाण यांना पुढील वाटचालिकरीता सर्व स्तरावरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

    हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिवार्दाने, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची घौडदौड सुरू असुन कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षात आकर्षित करण्यासाठी चांगलीच कंबर कसली असल्याने पक्ष वाढीसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देत नवनवीन पद जाहीर करण्यात येत असून ग्रुप ग्राम पंचायत साजगाव माजी सदस्य चिंतामण रामचंद्र चव्हाण याची शिवसेना साजगाव पंचायत समिती विभागप्रमुखपदि निवड करण्यात आल्याने त्या आशयाचे पत्र चिंतामण रामचंद्र चव्हाण देण्यात आले आहे. तसेच याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, खालापूर तालुकाप्रमुख संतोष विचारे, समन्वयक एकनाथ पिंगळे, अंकुश मोरे, जनार्दन कदम आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close