ताज्या घडामोडी

विटा नगरपरिषदेचा 125 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प*

*विटा नगरपरिषदेचा 125 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प*

कोणतीही कर न वाढीचा अर्थसंकल्प सादर

विटा प्रतिनिधी –

नगरपरिषद सन 2021-2022 या आर्थिक वर्षाचे तब्बल 125 कोटी 50 लक्ष 38 हजार 944 रुपयाचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील यांचे उपस्थितीत व उपनगराध्यक्षा सौ. सारिकाताई संजय सपकाळ यांनी सभेत अर्थसंकल्प सादर केला. मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष ॲड वैभव पाटील व सर्व नगरसेवक नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
*अर्थसंकल्पातील ठळक बाबी जमा बाजू*
नगरपालिकेस विविध उत्पन्नातून रक्कम रुपये 85,95,64,500/- इतके उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामध्ये घरपट्टी करापासून उत्पन्न रुपये 5,00,00,000 व पाणीपट्टी करापासून रुपये 4,50,00,000 मालमत्ता व फी पासून रुपये 2,47,43,500 महसुली व भांडवली अनुदान 62,75,45,000 उत्पन्न अपेक्षित धरणेत आले आहे. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नगरपरिषदेने केलेली नाही.
*अर्थसंकल्पातील ठळक बाबी खर्च बाजू*
नवीन रस्ते व दुरुस्ती रुपये 5,25,00,000 भुयारी गटर योजना रुपये 6,00,00,000 महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजना 7,50,00,000 आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना 5,00,00,000 पंतप्रधान आवास योजना 7,00,00,000 वैशिष्ट्यपूर्ण योजना 5,00,00,000 स्वच्छ महाराष्ट्र अभियान 1,50,00,000, स्वच्छ सर्वेक्षण प्रोत्साहनपर बक्षीस योजना अंतर्गत 10,00,00,000 नागरी दलितेत्तर योजना 75,00,000 14 वा वित्त आयोग 8,00,00,000 15 वा वित्त आयोग 7,50,00,000 घनकचरा व्यवस्थापन 1,00,00,000 रमाई आवास योजना घरकुल 50,00,000 मागासवर्गीय सुधारणा पाणीपुरवठा योजना 20,00,000 विशेष रस्ता अनुदान 4,00,00,000 विशेष वैशिष्ट्यपूर्ण ठोक अनुदान 2,00,00,000 नाविण्यपूर्ण योजना 1,00,00,000 जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान 3,00,00,000 गटर बांधकाम व दुरुस्ती 1,20,00,000 हरित पट्टे विकसित करणे 40,00,000 माझी वसुंधरा अभियान 35,00,000 नाट्यगृह बांधणे 25,00,000 व्यायाम शाळा विकसित बांधणे 20,00,000 त्याचप्रमाणे मॉडेल (डिजिटल) स्कूलसाठी तरतुद धरणेत आली आहे. गुंफा (मुळस्थान) येथील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणेसाठी ई- रिक्षाने वाहतूक करणेचे प्रस्तावित केले आहे.

*सन 2020-2021 चा सुधारित अर्थसंकल्प*
आरंभीची शिल्लक – 52,45,92,957/-
सन 2020-2021 ची जमा – 56,78,99,200/-
शिलकेसह एकूण जमा- 109,24,92,157/-
सन 2020-2021 चा खर्च – 69,70,17,713/-
अखेर शिल्लक – 39,54,74,444/-

*सन 2021-2022 चा अनुमाणित अर्थसंकल्प*
आरंभीची शिल्लक – 39,54,74,444/-
सन 2021-2022 ची जमा – 85,95,64,500/-
शिल्लकेसह एकूण जमा – 125,50,38,944/-
सन 2021-2022 चा खर्च – 125,47,48,977/-
अखेर शिल्लक – 2,89,967/-
*नगरपरिषदेचे शिल्लकी अंदाजपत्रक रक्कम रुपये 2,89,967 असे.*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close