ताज्या घडामोडी

एसएनडी अभियांत्रिकीच्या कॅम्पसमध्ये सात विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड

एकनाथ भालेराव

येवला, : बाभुळगाव येथील एस.एन.डी. अभियांत्रिकीच्या कॅम्पस ड्राइव्हमध्ये सात विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड झाली आहे.त्यांना चांगले पॅकेज मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड मध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली.यामध्ये अंतिम वर्ष कॉम्प्युटरच्या शुभम वडनेरे व फेनल पंड्या तर अंतिम वर्ष आयटीच्या अमित पाटील व योगराज गाडेकर या विद्यार्थ्यांची निवड झाली.या इंटर्नशिप अंतर्गत त्यांना दर शनिवारी स्मार्ट सिटीच्या विविध आय.टी. प्रोजेक्ट व टेक्नॉलॉजी ट्रेनिंग साठी सहभागी होणार आहेत.
तसेच भानवारिया इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा लिमिटेड जयपूर या कंपनीत इलेक्ट्रिकल शाखेचा विद्यार्थी योगेश घुले याची निवड झाली आहे.त्याला २ लाख २० हजारांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले तसेच पगारा व्यतिरिक्त भविष्य निर्वाह निधी विमा व राहण्याची इत्यादी सुविधा तसेच इतर इनसेन्टीव्ह देण्यात येणार आहेत. वेबटेक डेव्हलपर्स कंपनीच्या झालेल्या कॅम्पसड्राईव्हमध्ये १२० विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला.शुभम वडनेरे व अश्विनी कदम यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली.फेब्रुवारी अखेर अंतिम निवड फेरी होणार आहे.त्यांना वार्षिक ३ लाख २५ हजारांचे पॅकेज देण्यात येणार आहे.सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.पी.एम.पाटील शैक्षणिक अधिष्ठाता डॉ .कमलकिशोर मणियार, प्लेसमेंट अधिकारी प्रा.अतुल मोकळ यांचे मार्गदर्शन लाभले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष तथा आमदार किशोर दराडे,संचालक रुपेश दराडे यांनी अभिनंदन केले आहे.

सोबत फोटो

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close