ताज्या घडामोडी

*बार्टीतर्फे अंकाई येथे गाडगेबाबा जयंती साजरीःबचत गटांचा सहभाग* *सरपंच नगिनाबाई कासलीवाल यांनी केलं प्रतिमापूजन..*

सरपंच नगिनाबाई कासलीवाल यांनी केलं प्रतिमापूजन..

 *बार्टीतर्फे अंकाई येथे गाडगेबाबा जयंती साजरीःबचत गटांचा सहभाग*
*सरपंच नगिनाबाई कासलीवाल यांनी केलं प्रतिमापूजन..*

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची संस्था डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून बार्टीचे महासंचालक धम्मदिप गजभिये यांच्या मार्गदर्शनाने संपुर्ण महाराष्ट्रात गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात येत आहे.त्या निमित्ताने दि.२३ फेब्रुवारी रोजी अंकाई ता.येवला येथे गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नगिनाबाई बाबूशेठ कासलीवाल,प्रमुख वक्ते बार्टीचे समतादूत चंद्रकांत इंगळे व उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.अंकाई च्या नवनिर्वाचित सरपंच बचत गटांच्या मारदर्शक व प्रेरणा असलेल्या सौ नगिनाबाई बाबूशेठ कासलीवाल यांचा सत्कार बचत गटांमार्फत ग्रामसंघाच्या अध्यक्ष सरला काळे,सी आर पी सुनीता बढे,लता खंडेझोड यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत इंगळे यांनी गाडगेबाबा जयंती निमित्ताने प्रबोधन केले. तसेच बचत गटांना सक्षम करण्याच्या उद्देशाने गावागावात बचत गट स्थापन करणे,त्यांना कर्ज उपलब्धीसाठी प्रयत्न करणे,बचत गटाचे कामकाज,शासनाच्या कल्याणकारी योजना माहिती ,उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन ,प्रशिक्षण असे उपक्रम राबवत आहे.या पार्श्वभूमीवर महिलांनी बचत गटात सहभागी व्हावे.त्यांची आर्थिक ,सामाजिक उन्नती व्हावी.म्हणून ` ये ना गताई तू पण बचत गटाला’हे गीत सादर केले.या कार्यक्रमात सरपंच नगिना बाई कासलीवाल,
पोलिस पाटील जयश्री गौतम,
बचत गट वर्धीनी
सीआरपी लता खंडीझोड ,सुनिता बढे
ग्रामसंघ अध्यक्ष -सरला काळे
सचिव जुलेखा पठाण हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरला काळे,आभार लता खंडीझोड,यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेदचे नगरसुल क्लस्टर विशाल ठमके, रेखा खंडीझोड,तसेच गावातील बचत गटातील महिलांचे सहकार्य लाभले.
[ अंकाई येथे गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करतांना सरपंच नगिनाबाई कासलीवाल व इतर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close