ताज्या घडामोडी

वंजारी सेवा संघ तर्फे. संत भगवान बाबा .यांची तिथी नुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याची मागणी करण्यात आली,

वंजारी सेवा संघ तर्फे. संत भगवान बाबा .यांची तिथी नुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याची मागणी करण्यात आली,

पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार

मनमाड.वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव प्रमुख व जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड ओळखला जात असून, संत भगवान बाबा. यांनी हा गड अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उभारलेला आहे. भगवानगड हा पूर्वी. धौम्यगड.या नावाने ओळखला जात असे त्यावेळी भारताचे माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १मे१९५८रोजी या गडाचे उद्घाटन करून त्यांनी हा गड भगवान गड या नावाने ओळखला जावा असे आवाहन केले व तेव्हापासून हा गड भगवानगड या नावाने खऱ्या अर्थाने नावारूपाला आला श्रद्धा विविध क्षेत्रातील नामांकित थोर व्यक्ती तसेच केंद्र व विविध राज्य मधील मंत्री महोदय हे भगवानगड येथे नतमस्तक होताना पाहायला मिळतात तसेच वंजारी समाजाचे प्रेरणास्थान माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांनी प्रत्येक वेळी राजकारणाच्या वाटचालीचे रणसिंग हे भगवान गडा वरूनच फुंकले व त्या नुसारच महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे पडसाद उमटत गेले.वंजारी समाजाबरोबरच इतर समाजामध्ये ही भगवान बाबांना मानणारा मोठा वर्ग असून सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भगवान गडाची उभारणी झालेली आहे तसेच सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून भगवान गडाकडे पाहिले जाते. भगवान बाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते.समाजाला सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण भगवान बाबांनी देऊन योग्य दिशा दाखवण्याचे काम केले अशीच जनकल्याण माची कितीतरी कार्य भगवान बाबांनी समाजासाठी केले असून ते न विसरण्यासारखे व भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहेत यावरून भगवान बाबा यांच्या कार्याच्या महती ची प्रचिती येतेच.म्हणूनच भगवान बाबा यांची जयंती व पुण्यतिथी ही शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी व्हावी अशी वंजारी समाजाचे समाज बांधवांची मनोमन इच्छा भावना आहे तरी जण भावनेचा आदर करून आम्ही .वंजारी सेवा संघ. उत्तर महाराष्ट्र मार्फत अशी मागणी करतो कि, संत भगवान बाबा.यांची तिथीनुसार जयंती व पुण्यतिथी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यास साजरी करण्यात यावी यासाठी आपल्या मार्फत शासन दरबारी दखल घेऊन या मागणीची सासर निर्णया मध्ये तरतूद करण्यासाठी संबंधित मंत्रालयीन विभागात सूचित करावे अशी मागणी मंडळ अधिकारी कैलास साहेब चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी .किरण भाऊ कातकडे जिल्‍हा संघटक. संतोष भाऊ कुटे जिल्हा उपाध्यक्ष. गणेश भाऊ हाडपे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र भाऊ सांगळे शहराध्यक्ष अक्षय भाऊ सांगळे युवा शहराध्यक्ष मधुकर भाऊ आव्हाड मनमाड शहर सरचिटणीस रमेश नाना इप्पर शहर कार्याध्यक्ष समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागरे शंकर सर केकान सतीश आव्हाड रवी भाऊ नागरे सचिन भाऊ कांदे सुरेंद्र लांडगे सिद्धेश वाघ गोरखनाथ सानप रविभाऊ बुरकुल क्रांती आव्हाड व वंजारी सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते पदअधिकारी उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close