ताज्या घडामोडी

अनकाईच्या सरपंचपदी नगिनाबाई कासलीवाल

यावेळच्या निवडणुकीत कुटुंबातील अलकेश कासलीवाल व त्यांच्या मातोश्री सौ.नगिना कासलीवाल दोघे ही मोठ्या मताधिक्याने निवडून आले

अनकाईच्या सरपंचपदी नगिनाबाई कासलीवाल

येवला, : लक्षवेधी ठरलेल्या अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते अल्केश कासलीवाल यांच्या मातोश्री व स्व डॉ चंद्रकांत वैद्य यांचे कट्टर समर्थक माजी सरपंच बाबूशेठ कासलीवाल यांच्या पत्नी सौ.नगिनाबाई कासलीवाल व उपसरपंचपदी शिवम आहिरे यांची बिनविरोध निवड झाली.
नुकत्याच पार पडलेल्या अनकाई ग्रामपंचायत निवडणुकीत स्व डॉ चंद्रकांत वैद्य यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या डॉ.प्रितम वैद्य,अलकेश कासलीवाल,किरण बडे,शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने एकतर्फी बहुमत मिळवत सत्ताधारी पॅनल चे नेते डॉ सुधीर जाधव यांच्या पॅनल धुव्वा उडवत सत्ता हस्तगत केली होती.शुक्रवारी (ता.१२) ला झालेल्या सरपंच- उपसरपंच निवडीप्रसंगी सरपंच पदासाठी सौ. कासलीवाल व उपसरपंच पदासाठी अहिरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या नावाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.मोटे,
तलाठी गिरी व ग्रामसेवक भाबड यांनी करताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रितम वैद्य,अलकेश कासलीवाल,सागर सोनवणे,राजाराम पवार,सविता टिटवे हे उपस्थित होते तर पॅनलचे प्रमुख मार्गदर्शक बाबूशेठ कासलीवाल,त्र्यंबक बडे,चंद्रभान व्यापारे,शांताराम पवार,शिवाजी व्यापारे,हरिभाऊ चव्हाण,मोतीराम वैद्य,केदु सोनवने,राणूबा वैद्य,नारायण वैद्य,तावबा सोनवणे,दत्तू सोनवणे आदींच्या पुढाकाराने बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.यावेळी बाळासाहेब चव्हाण,चेतन कासलीवाल,भगवान जाधव,रमेश देवकर,बाळू जाधव,अप्पा सोनवणे,उत्तम देवकर,संतोष सोनवणे,अशोक देवकर,राजेंद्र लालसिंग परदेशी, सागर परदेशी,मुकेश परदेशी,जितेंद्र गायकवाड,मयाराम नवले,रोहिदास भिडे,मारुती वैद्य,शंकर चव्हाण,शरद वैद्य,दिपक वाघ,सुधाकर सोनवणे,शशिकांत सोनवणे,कचरू सोनवणे,अशोक अहिरे,मेहबूब पठाण,श्रीराम सोनवणे,किरण जाधव शंकर सोनवणे,रवी सोनवने,अमित पवार,धर्मा ढामळे,दयाराम भिडे,दशरथ पवार देविदास पवार,शुभम शिंदे,भाऊसाहेब पवार,दिपक देवकर,रमेश सोनवणे, विलास सोनवणे,राहुल देवकर,अतुल व्यापारे,रवि काळे आदी समर्थक उपस्थित होते.निकालानंतर जेष्ठ नेते कै. चंद्रकांत वैद्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

करीत गावात जंगी जल्लोषात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
★फोटोअनकाई येथील सरपंचपदी नगिनाबाई कासलीवाल, तर उपसरपंचपदी शिवम अहिरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करतांना पदाधिकारी,सदस्य व ग्रामस्थ

सलीवाल कुटुंब दहाव्यादा ग्रामपंचायतीत!

अनकाई ग्रामपंचायतीत बाबूशेठ कासलीवाल हे १९८४ पासून ५ वेळा अन नगिना कासलीवाल या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.बाबूशेठ कासलीवाल हे १७ वर्ष उपसरपंच तर ४ वर्ष सरपंच होते.यावेळच्या निवडणुकीत कुटुंबातील अलकेश कासलीवाल व त्यांच्या मातोश्री सौ.नगिना कासलीवाल दोघे ही मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून मायलेक निवडून येण्याचा इतिहास रचला.”गावाचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही काम सर्वांना सोबत घेऊन काम करू.पॅनलने घोषित केलेल्या वचननाम्याप्रमाणे डिजिटल शाळेसाठी निधी मंजूर झाला असून इतर वचन पण पूर्ण करत सर्वांगिण विकास करू.अनकाई किल्ल्यावर पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते.
– अलकेश कासलीवाल,सदस्य,अनकाईअलकेश कासलीवाल,सदस्य,अनकाई

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close