ताज्या घडामोडी

भाजपशी युती करून आरपीआय नवी मुंबई मनपा निवडणुकीत 8 जागा लढविणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

नवी मुंबईत रिपाइं चा मी रिपब्लिकन मेळावा यशस्वी

*भाजपशी युती करून आरपीआय नवी मुंबई मनपा निवडणुकीत 8 जागा लढविणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*नवी मुंबईत रिपाइं चा मी रिपब्लिकन मेळावा यशस्वी*
भारती धिंगान( प्रतिनिधी)
नवी मुंबई दि. 21-

नवी मुंबईत वॉर्ड आहेत एकशे अकरा ;
काँग्रेस राष्ट्रवादीचा करायचा आहे बकरा ;
आम्ही चालू देणार नाही शिवसेनेचा नखरा ;
भाजप आरपीआय युती च्या विजयासाठी गणेश नाईक आणि मी मारणार आहे नवी मुंबईच्या चकरा!
अशी कविता सादर करून नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित रिपाइं च्या मी रिपब्लिकन मेळाव्यात निवडणूक प्रचाराचे रणशिंग रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी फुंकले.

आज वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे रिपाइं चा नवी मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यात ना.रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत रिपब्लिकन पक्ष युती करून किमान 8 जागांवर आपले उमेदवार उभे करील.भाजप ला 25 जागांची यादी दिली असून त्यातील 8 जागा रिपाइंला सोडण्यात याव्यात असा प्रस्ताव भाजप ला दिला असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
अनेकांनी झेंडा बदलला; पक्षाचे नाव बदलले मात्र आम्ही कधीही हाती घेतलला निळा झेंडा खाली ठेवणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष माझा रिपब्लिकन पक्ष म्हणून आम्ही कधीही रिपब्लिकन नाव बदलणार नाही. आम्ही अभिमानाने जगाला सांगत आहोत आमची घोषणा आहे मी रिपब्लिकन ! माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. मंत्रिपदा पेक्षा कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला मोठा मानतो.मंत्रिपद असो मी नसो मी रिपब्लिकन पक्षाचा गाढा पुढे घेऊन जात आहे. जनता माझ्या सोबत आणि मी जनतेसोबत आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले.

नवी मुंबई प्रमाणे औरंगाबाद;वसई विरार ; कल्याण डोंबिवली या महापालिका आणि पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका सह अन्य 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजप च्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा राहून युती करेल असा विश्वास आम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिला असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले.
येत्या दि.25 फेब्रुवारी रोजी देशभर रिपाइं तर्फे भूमीमुक्ती आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात गरीब भूमिहिनांना 5 एकर जमीन कसण्यासाठी द्यावी ज्यामुळे शहरात येणारे लोंढे थंबतील तसेच दारिद्रय रेषेखालील गरिबांची वाढती संख्या कमी होईल असा दावा ना रामदास आठवले यांनी केला.

नवी मुंबईतील झोपडीवासीयांचे प्रश्न सोडविण्यात रिपब्लिकन पक्षाने महत्वाची भूमिका निभावली आहे.भारतीय दलित पँथर पासून नवी मुंबईतील झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठी; झोपडीवासीयाना पक्की घरे मिळवून देण्यात रिपाइं ने वेळोवेळी आंदोलन केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत नवी मुंबईतील रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. यावेळी रिपाइंचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुमंतराव गायकवाड ; सुरेश बारशिंग; पनवेल चे उपमहापौर जगदीश गायकवाड; नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष
सिद्राम ओव्हाळ; बाळासाहेब मिरजे;विजय गायकवाड; जयश्री सुरवसे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close