ताज्या घडामोडी

मुस्लिम आरक्षण परिषदेचे शरद पवारांना आमंत्रण*

समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, मुस्लिम समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती व्हावी यासाठी राजकीय प्रयत्नाची आवश्यकता आहे.

*मुस्लिम आरक्षण परिषदेचे
शरद पवारांना आमंत्रण*

नाशिक :मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसह मुस्लिम समाजाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने दी.18/2/21 रोजी प्रदेशाध्यक्ष अजिज पठाण यांचे नेत्रुत्वात महाराष्ट्र राज्यातील समिति चे पदाधिकारी यांनी मा.अजीतदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, मा.खासदार सुप्रीयाताई सुळे, मा.

आमदार रोहीतदादा पवार याची मुबंई येथे भेट घेउन मुस्लिम समाजास उच्च न्यायालयाने मान्य केलेले आरक्षण लागु करावे तसेच ईतरही मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालण्यात आले तसेच लातुर येथे होणार्या ‘मुस्लिम आरक्षण परिषदे’चे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मुंबई येथे राष्ट्रवादी सुप्रीमो मा.शरद पवार यांची भेट घेण्यात आली,यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अजीज पठाण, सरचिटणीस मोहसीन खान, उपाध्यक्ष जब्बार काझी, कादर खान, मुश्ताक शेख, मुक्तार शेख, रसुल खान, शाहीद अन्सारी, शेख उस्मान, अॅड शेख शफी, अजीम तंबोली यांची उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक आदि क्षेत्रात पिछेहाट होत आहे. त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, मुस्लिम समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती व्हावी यासाठी राजकीय प्रयत्नाची आवश्यकता आहे. त्यामुळे पुरोगामी विचारसरणीचा चेहरा मानल्या जाणार्‍या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘ मुस्लिम आरक्षण परिषदेचे’ आमंत्रण देण्यात आल्याचे मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेश सरचिटणीस मोहसीन खान यांनी सांगितले

अजिज पठाण प्रदेशाध्यक्ष मुस्लिम आरक्षण संघर्ष समिति महाराष्ट्र

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close