ताज्या घडामोडी

कारसुल युवतीच्या हत्येमागे दोघे गजाआड… अवघ्या ४८ तासात पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशन ने लावला छडा.

कारसुल युवतीच्या हत्येमागे दोघे गजाआड…

अवघ्या ४८ तासात पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशन ने लावला छडा.

प्रतिनिधी – पिंपळगाव बसवंत.

कार सुळ गावातील तरुणी दीपिका ताकाटे (१७) हिचा गळा घोटून खून करून आहेरगाव पालखेड डाव्या कालव्यात तिचा मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४८ तासात पिंपळगाव पोलिसांनी याचा छडा लावत तरुणीचा चुलत भाऊ संशयित विक्रम गोपीनाथ ताकाटे (रा.कारसुल) व सहकारी मित्र सौरभ दत्तात्रय निफाडे ( रा. खडकजांब) या दोघांना जेरबंद करत खुनाची कबुली करून घेतली आहे.
कु. दिपीका अजय ताकाटे ही पिंपळगाव बसवंत येथे १२ वी वाणिज्य शाखेत शिकत होती. नियमितपणे ये जा करणारी दिपीका घरी परत न परतल्याने घरच्यांनी शोधशोध सुरू केली.परंतु ती सापडली नाही. मंगळवारी (दी.१६) सकाळी दहा वाजता आहेरगाव पालखेड डाव्या कालव्यात तिचा मृतदेह आढळला. पालखेड डाव्या कालव्याला ५ फूट पाणी असताना ती बुडेल कशी असा शंका व्यक्त झाली. तिचा घातपात झाला असावा. पोलिसांनी आपली सूत्रे फिरवत विक्रम ताकाटे व सौरभ निफाडे यांना आपला हिसका दाखवून कबुल केले. पिंपळगाव बसवंत येथील पोलिसांच्या माहितीनुसार सोमावरी विक्रमने दीपिकाला पिकअप मध्ये सटाणा – ताराहबाद रस्त्यावर नेऊन त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास मित्राच्या साहाय्याने ओढणीने तिचा गळा आवळला परंतु तिचा जीव न गेल्याने तिला गाडीतील दोरीने पुन्हा तिचा गळा आवळला. त्यानंतर रात्री १.३० च्या सुमारास आहेरगाव येथील पालखेड डाव्या कालव्यात फेकला. पालखेड डाव्या कालव्यात पाणी कमी असल्याने तिचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. स्थानिकांनी तत्काळ पिंपळगाव पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांनी या प्रकरणाचा पर्दा फाश करत संशयितांना अवघ्या ४८ तासात अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाच्या तपास उपाधिक्षक अर्जुन भोसले, पप्पू देवरे, पप्पू कादरी, मिथुन घोडके, उषा वाघ, रवी बारहाते, अमोल जाधव सहभागी होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close