मराठवाडा

कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवर आज संयुक्त किसान मोर्चा वतीने रेल रोको व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने,

कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार

कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवर आज संयुक्त किसान मोर्चा वतीने रेल रोको व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने,
केंद्रातील भाजप सरकारने अडेलतट्टू आणि निष्ठूर भूमिका घेतली असून सरकार आंदोलनाशी कोणत्याही प्रकारची चर्चेची तयारी दर्शवली नाही, तिन्ही कृषीकायद्यातील शेतकर्‍यांना गळफास ठरणाऱ्या त्रुटी व वीज विधेयक रद्द करण्यात यावे, रास्त हमीभाव देणारा कायदा पास करावा या महत्त्वाच्या मागण्या व दिल्ली किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज शेतकरी संघटना अखिल भारतीय किसान सभा व बळीराजा पार्टीच्या वतीने शेतकरी संघटनेचे नेते अशोकराव माने किसान सभेचे उमेश देशमुख दिंगबर कांबळे व बळीराजा पार्टीचे महासचिव बाळासाहेब रास्ते यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ रेल्वे स्थानकावर केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देत आंदोलन केले,
यावेळी उपस्थितीत आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून 1)काळे कायदे रद्द करा,
2)नरेद्र मोदी किसान विरोधी
3)शेतकरी एकजुटीचा विजय असो, 4)किसान एकता जिंदाबाद च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला,
तिन्ही कृषी कायद्यातील त्रुटी रद्द करा आणि वीज विधेयक 2020रद्द करा, c2+50टक्के हमीभाव देणारा कायदा लागू करा,
पंतप्रधानांनी शेतकर्‍यांना अपमानित केल्यामुळे समस्त भारत देशातील शेतकरी भविष्यातील सर्व आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार उपस्थित सर्व शेतकरी नेत्यांनी केला,

यावेळी भारतीय रेल्वे पोलिसांनी व कवठेमहांकाळ पोलिस निरीक्षक करेसाहेब यांनी आपआपल्या खात्याच्या वतीने आंदोलन ठिकाणी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, आंदोलन यशस्वी रित्या पार पडले, यावेळी शेतकरी संघटनेचे नंदकुमार पाटील संभाजीराजे पवार अकुंश रास्ते आदिसह शेकडो आंदोलन शेतकरी उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close