ताज्या घडामोडी

वसई विरार मध्ये भाजपा ओबीसी मोर्चाचे संघटन मजबूत करण्याचा निर्धार ‌‌

सुहास पांचाळ

वसई विरार मध्ये भाजपा ओबीसी मोर्चाचे संघटन मजबूत करण्याचा निर्धार ‌‌
वसई : भाजपा ओबीसी मोर्चा वसई विरार शहर जिल्हा बैठक भाजपा कार्यालय सातीवली येथे प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर, प्रदेश महिला संपर्क प्रमुख वनिता लोंढे, प्रदेश सदस्य तथा जिल्हा प्रभारी लता पगारे, प्रदेश सदस्य केदारनाथ म्हात्रे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा सरचिटणीस निलेश राणे, गणेश पाटील यांच्या सह जिल्हा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला.मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यावर वसई तालुक्यात सुमारे तीनशे कार्यकर्ते ओबीसी मोर्चात जोडले जाऊन ओबीसींच्या मुलभूत प्रश्नांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी कार्य करतील असा विश्वास जिल्हा कार्यकारिणी तर्फे मान्यवरांना देण्यांत आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close