ताज्या घडामोडी

अर्नाळा ग्रामपंचायतीने पटकावला सन २०१९ – २० चा सुंदर गाव पुरस्कार

सुहास पांचाळ

अर्नाळा ग्रामपंचायतीने पटकावला सन २०१९ – २० चा सुंदर गाव पुरस्कार

पालघर :-अर्नाळा ग्रामपंचायतीने पटकावला सन २०१९ – २० चा सुंदर गाव पुरस्कार जिल्हा परिषदेच्या सन २०१९ – २० चा आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार अर्नाळा ग्रामपंचायतीस मिळाला आहे.
सदरचा पुरस्कार मा जिल्हाधिकारी माणिकराव गुरसाळ व जिल्हा परिषद अध्यक्षा मा भारती ताई कापडी ह्यांच्या हस्ते अर्नाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता बाळशी , उपसरपंच महेंद्र पाटील व ग्रामविकास अधिकारी पंकेश संखे ह्यांनी स्वीकारला.
ह्यावेळी सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र व सुमारे ८ लाख ७३ हजार रुपये चा धनादेश देण्यात आला.
तसेच हा पुरस्कार मिळविण्याकरिता जिल्हा परिषद सदस्या आशा चव्हाण , उपसभापती वनिता तांडेल ,सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी विविध सामाजिक संघटना , संस्था व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close