ताज्या घडामोडी

क्षत्रिय मराठा समाज्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन संपन्न

माथेरान मध्ये आठवड्याभरात दोन वेळा रक्तदान माथेरान रक्तदात्याचा भरघोस प्रतिसाद,

क्षत्रिय मराठा समाज्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन संपन्न

माथेरान मध्ये आठवड्याभरात दोन वेळा रक्तदान

माथेरान रक्तदात्याचा भरघोस प्रतिसाद,

चंद्रकांत सुतार माथेरान

क्षत्रिय मराठा समाजा तर्फे माथेरान मध्ये रक्तदान शिबिर बुधवार दिनांक १७/२/२०२१ रोजी आयोजित केले गेले, या शिबिरास समाज्यातील पुरुष महिलांनी उस्फूर्तपने सहभागी होत एक सामाजिक बांधिलकी जपली आहे, मागील वर्ष भरात कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरून सोडले होते, त्यामुळे लॉक डाऊनच्या परिस्थितीत मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबानी रक्तदान करण्यास आव्हाहन केले होते,त्याला प्रतिसाद देताना माथेरान येथील अग्रेसर असलेली सामाजिक संस्था क्षत्रिय मराठा समाज्याचे आज रक्तदान शिबिर असेंब्ली हॉल येथे आयोजित केले होते समाज्याचे जेष्ठ माजी सचिव रामचंद्र गणपत कदम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी समाज्याचे अध्यक्ष प्रवीण सकपाळ , उपाध्यक्ष सचिन दाभेकर,विकास पार्टे, संतोष शिंदे, योगेश जाधव प्रदीप घावरे , गिरीश पवार, महिला सौ रजनी कदम हेमलता कदम, समाज बांधव ,नगरसेवक, नगरसेविका, कर्जत येथील समर्पक ब्लडबँकेचे सर्व डॉक्टर कर्मचारी वर्ग व या कार्यक्रमास उपस्थित होते, राजाभाऊ कोठारी , माथेरान पोलीस स्टेशनचे Api प्रशांत काळे साहेब, सर्व समाज बांधव महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली , या वेळी सर्व रक्त दात्याना एक भेट वस्तू देण्यात आली , आजच्या रक्तदान कार्यक्रमास एकूण 58 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले, विविध संस्था , राजकीय पक्ष, मंडळाचे मान्यवर, तसेच समाज्याचे सदस्य ह्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थिती होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close