महाराष्ट्र

सतरा वर्षांनी जुने मित्र एकत्र, गुरुजन व शाळेचे मानले आभार .

खालापूर – समाधान दिसले

सतरा वर्षांनंतर डॉ.पा.म.विद्यालय वाशिवली शाळेतील 2003-04 मध्ये दहावी शिकणारे विद्यार्थी – विद्यार्थिनी एकत्र आले आणि आपला गेट टूगेदर साजरा केला. सतरा वर्षांनी जुने मित्र -मैत्रिणी भेटल्याचा आनंद सर्वांनी अनुभवला.

त्याप्रसंगी त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व गुरुजन उपस्थित होते. याच सर्व सरांनी मार्गदर्शन केले म्हणून आम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असल्याची भावना या सर्व माजी विद्यार्थ्यांत होती. यातील काही प्रतिष्ठित व्यवसाहिक, इंजिनिअर, प्रोफेसर, डॉक्टर तसेच गावंच राजकरण करणारे सरपंच झाले आहेत. कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थी विकास देवघरे (सरपंच-ईसाबे) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या गुरुजनांनी आम्हाला घडविले, दिशा दिली म्हणून आम्ही आज समाजात स्वतःच्या नावाची ओळख करीत आहेत. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी अमित खिस्मतराव, जितेंन पाटील, अतुल मालकर, हरेश जाधव, राजेंद्र खंडागळे, कैलास देवघरे, स्वप्नील ठोबरे, विकास देवघरे, आकाश म्हात्रे तसेच नीता पाटील, उर्मिला मोरे, निकिता पवार, विद्या देवघरे, जयश्री पवार हे सर्व उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close