ताज्या घडामोडी

भारतीय जनता पक्षाची महत्वपूर्ण बैठक संपन्न। 

भारतीय जनता पक्षाची महत्वपूर्ण बैठक संपन्न।

येवला ;:भारतीय जनता पक्षाची बुथ संपर्क अभियाना अंतर्गत मंडल बैठकीचे आयौजन करण्यात आले होते,तसेच संघटनात्मक बांधणी व अन्य विषयावर महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह,येवला येथे पार पडली यावेळी भातीय जनता पक्षाचे विद्यमान नगराध्यक्ष बंडू पहिलवान क्षिरसागर,जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रमोदजी सस्कर,शहराध्यक्ष तरंग गुजराथी,प्रदेश बुनकर प्रकोष्ठ सदस्य मनोज दिवटे,संघटन सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर,जेष्ठ संघाचे शामशेठ काबरा,छायाताई क्षिरसागर,पुष्पाताई गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर बैठकीस विद्यमान नगराध्यक्ष बंडू पहिलवान क्षिरसागर यांनी आगामी काळात निवडणुकांसाठी कोण कोणती तयारी करणे आवश्यक आहे यावर मार्गदर्शन केले.तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रमोदजी सस्कर यांनी बुथप्रमुख व शक्तिकेंद्रप्रमुख यांच्या जबाबदारी विषयी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात शहर पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम नगराध्यक्ष बंडू पहिलवान क्षिरसागर,शहराध्यक्ष तरंग गुजराथी,प्रमोद सस्कर, मनोज दिवटे,राहुल पटेल,छाया ताई क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले,कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजपा शहर सरचिटणीस पुरुषोत्तम रहाणे सर यांनी केले तसेच आगामी कार्यकाल लक्सlत घेता पूर्वतयारी संबंधी आढावा सादर केला.सदर कार्यक्रमास कुणाल क्षिरसागर, राधेश्याम परदेशी,मयूर मेघराज,सुकृत पाटील,मुकेश चवळे,सुनील बाबर,राजेंद्र नागपुरे,किशोर राजपूत,गणेश दोडे, सुनील काटवे,मनीष पटेल,बाबूसेठ खानापुरे,अशोक सासे,मच्छिंद्र मोरे,शेख हुसेन,अक्षय कुलकर्णी,प्रसिद्धी प्रमुख प्रणव दीक्षित ,संजय खानपुरे,अनिल हलवाई, राहुल पटेल,सौ मनीषा कुलकर्णी,अनुपमा मढे, तसेच सर्वस्वी नगरसेवका छाया ताई क्षीरसागर ,सौ पुष्पा गायकवाड़,,सौ सविता बाबर ठान गांव चे सरपंच श्री कव्हात यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.बुथप्रमुख,शक्तिकेंद्रप्रमुख,मंडल पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरवातीला पुलवामा येथे बलिदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच स्वर्गीय सुष्माजी स्वराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्विते साठी सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वी प्रयत्न केले ,कार्यक्रमाचे आभार श्री मनोज दीवटे यांनी मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close